TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th कोण होणार आजचा किंग.
TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th कोण होणार आजचा किंग.
![]() |
आज संध्याकाळी कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या Tata IPL 2023 च्या 9 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात कोण ठरणार किंग, ते येणारी वेळच ठरवेल पण दोन्ही संघाचा मागच्या सामन्याचा रेकॉर्ड बघितला तर, रॉयल चॅलेंजर बेंगलोर ला पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध विजय प्राप्त झाला आहे तर दुसऱ्या कोलकाता नाईट रायडर्स ला पंजाब किंग्स विरुद्ध च्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.त्यामुळे रॉयल्स चॅलेंजर बेंगलोर चा आत्मविश्वास वाढला आहे तर कोलकाता नाईट रायडर्स आपलं पहिलं विजयी खातं उघडण्याच्या प्रयत्नशील असतील, त्यामुळेच आजचा सामना म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे, त्यामुळे आजच्या ईडन गार्डन हे आपल्या संघाला आत्मविश्वास वाढविण्यासाठी सामना बघायला येतील. तर बघुया मागच्या सामन्याचा तपशील.
कोलकाता नाईट रायडर्स ची सुरवात झाली निराशाजनकTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आधी फलंदाजी चा निर्णय घेऊन सलामीला आलेल्या जोडीला काही खास कमाल करता आली नाही मनदीप सिंग ला अर्षदीप सिंग ने 2 धावा करून तंबूत माघारी पाठवलं, तर आर गुलबाज ने अडखळत 22 धावा केल्या पण त्याचा नाथन एलिस ने त्रिफळा उडवला,मग त्यापाठोपाठ अनुकूल रॉय 4 धावा करून बाद झाला,त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा ने डाव सावरण्यासाठी प्रयत्न केला, ते पण जास्त मोठी धावसंख्या उभी करू शकले नव्हते वेंकटेश अय्यर 34 तर नितीश राणा 24 धावा करून बाद झाले,त्यानंतर रिंकू सिंग ने 4 धावा केल्या तर शेवटच्या ओव्हर्स मध्ये आंद्रे रसेल ने ताबडतोब 35 धावा करून संघाच्या धवांच्या डोंगर वाढवायला मदत केली,मग शेवटी शार्दूल ठाकुर 8 तर सुनील नरेंन 7 धावा करून नाबाद राहिले, कोलकाता नाईट रायडर्स चा स्कोर D/L method मुले 16 ओव्हर्स मध्ये 146 रन्स पर्यंत च मजल मारू शकला आणि पंजाब कडून 7 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
कोलकाता नाइट रायडर्स चे गोलंदाज ठरले अपयशी
कोलकाताच्या गोलंदाजांना पंजाब किंग्स च्या फलंदाजांना बाद करायला मोठी कसरत करावी लागली उमेश यादव,सुनील नरेंन आणि वरून चक्रवर्ती ने प्रत्येकी एक गडी बाद केला आणि टीम सौदी ने 2 गडी बाद केले पण मोबदल्यात त्याला 54 धावा खर्च कराव्या लागल्या, त्यामुळे पंजाब किंग्स ची टीम 20 ओव्हर्स मध्ये 191/5 अशी मजल माफु शकली.
![]() |
रॉयल चॅलेंजर बंगलोर चे खेळाडू आहेत फॉर्मातTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
रॉयल चॅलेंजर बेंगलोर चे खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यामुळे ते फॉर्मात आहेत, मुंबई इंडियन्स विरुद्ध च्या सामन्यात सलामीला आलेला विराट कोहली आणि कर्णधार फाफ दु प्लेसिस यांना धमाकेदार सुरवात करून 150 रन्स च्या वरती भागीदारी केली, विराट कोहली ने 49 चेंडूत 82 धावा करून नाबाद राहिला तर फाफ दु प्लेसिस ने 43 चेंडूत 73 धावा केल्या, त्याची अर्षद खान ने टीम डेव्हिड कडे झेल देऊन शिकार केली, त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक ला भोपळा ही ना फोडता कॅमरून ग्रीन ने तंबूत पाठवले, त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल 12 धावा करून नाबाद राहिला आणि मुंबई इंडियन्स ने दिलेलं 172 धावांचं लक्ष 16.2 ओव्हर्स आणि 8 गडी राखून पूर्ण केलं.
बेंगलोर रॉयल चॅलेंजर चे बॉलर्सने केली समाधानकारक कामगिरी.TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर च्या बॉलर्स ने समाधानकारक कामगिरी केली असता मोहम्मद सिराज, रिस टोपले, आकाश दीप, हर्षल पटेल, मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला तर करणं शर्मा ने 2 गडी बाद केले त्यामुळे मुंबई इंडियन्स ला 171 धावांवर रोखता आलं.
![]() |
IPL च्या इतिहासातली ईडन गार्डन वरची आजपर्यंतची स्थिस्ती काय म्हणतेTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
ईडन गार्डन स्टेडियम वर आतापर्यंत IPL मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स चे एकुण 30 सामने झालेले आहेत, त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्स 16 सामने तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर 14 सामने जिंकले आहेत,रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स मध्ये झालेल्या शेवटच्या 5 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने 3 तर कोलकाता नाईट रायडर्स ने 2 सामने जिंकले आहेत, दोघे टीमची कामगिरी पाहता सरासरी चांगलीच म्हणावी लागेल.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणं फायदेशीर ठरेलTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
ईडन गार्डन वर आतापर्यंत IPL चे 77 सामने खेळवले गेले आहेत, तर त्यात 45 सामने धावांचा पाठलाग करतांना जिंकले आहेत तर 31 सामने प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.त्यामुळे इथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार आधी गोलंदाजी घेणं पसंत करेल.
ईडन गार्डन ची खेळपतीचा तपशीलTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
ईडन गार्डनवरील खेळपट्टी इथे नेहमी फलंदाजाला पूरक किंवा फायदेशीर अशीच राहिली आहे रात्री 9 वाजेनंतर इथे ओस पडायला सुरुवात होऊन जाते, त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड जाते व फलंदाजी करणं सोपं जातं, त्यामुळे इथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी कमीत 175 धावांचा डोंगर उभा करावा लागेल, त्यामुळे इथे जास्तीत जास्त धावा करणं फायदेशीर ठरेल.
ईडन गार्डन वरचं तापमान काय म्हणतंTATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
ईडन गार्डनवरचं तापमान आज कमळ 41℃ जाण्याची शक्यता आहे आणि किमान 27℃ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, इथे आज आकाश साफ दिसतं हे, त्यामुळे पावसाची शक्यता शून्य आहे.
तर आजच्या सामना हा अटीतटीचा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतो आणि कोण हरतो हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
★ संभाव्य खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे ★
TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
● रॉयल चॅलेंजर बेंगलोर-Royal Challenger Banglore
1] विराट कोहली
2] फाफ दु प्लेसिस(C)
3] दिनेश कार्तिक(WK)
4] ग्लेन मॅक्सवेल
5] मायकेल ब्रेसवेल
6] शहबाज अहमद
7] हर्षल पटेल
8] आकाश दीप
9] रिस टोपले
10] मोहम्मद सिराज
11] करण शर्मा
● कोलकाता नाईट रायडर्स-Kolkata Knight Riders
1] मनदीप सिंग
2] आर गरबाज(WK)
3] अनुकूल रॉय
4] वेंकटेश अय्यर
5] नितीश राणा(C)
6] रिकू सिंग
7] आंद्रे रसेल
8] शार्दूल ठाकूर
9] सुनील नारायण
10] टीम सौदी
11] उमेश यादव
तर तुम्हाला आमचा आजचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट आणि शेअर करन नक्की कळवा...धन्यवाद.
TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR
शेठ हे पण वाचा:-
- CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
- TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th
- TATA-IPL-2023, Panjab kings vs Kolkata Knight Rider
- LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय
- RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी
- GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले



Post a Comment