PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21,पंजाब किंग्स ने लखनऊ सुपर जायन्ट्स चा 3 विकेट्स ने उडवला धुव्वा.
PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21,पंजाब किंग्स ने लखनऊ सुपर जायन्ट्स चा 3 विकेट्स ने उडवला धुव्वा.
![]() |
| PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21 |
PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम लखनऊ येथे झालेल्या IPL 2023 सिजन मधल्या 21 व्या PBKSपंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स सामन्यात, पंजाब किंग्स ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,तेव्हा प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या लखनऊ सुपर जायन्ट्स कडून सलामीला आलेला लखनऊ सुपर जायन्ट्स चा कर्णधार के एल राहुल आणि कायले मेयर्स ने लखनऊ सुपर जायन्ट्स ला चांगली सुरवात करून दिली.
53 रन्स वर पडली पहिली विकेट
लखनऊ सुपर जायन्ट्स ची पंजाब किंग्स विरुद्ध सुरवात चांगली झाली असतांना आठव्या ओव्हर च्या चौथ्या बॉल ला लखनऊ सुपर जायन्ट्स ची पहिली विकेट पडली कायले मेयर्स च्या रुपात, त्याने 23 बॉल्स मध्ये 29 रन्स केले,त्याला हरप्रित ब्रार ने हरप्रित सिंग कडे कॅच देऊन आऊट केले.तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स 53 रन्स वर 1 आउट असा होता.
त्यानंतर आलेला दीपक हुड्डा 2 रन्स वर आउट झाला
कायले मेयर्स आउट झाल्यावर खेळायला आलेला दीपक हुड्डा ला साजेशी कामगिरी करता आली नाही, तो नवव्या ओव्हर्स च्या चौथ्या बॉल वर दीपक हुड्डा आउट झाला,त्याने 2 रन्स केले, सिकंदर रजा ने LBW आउट केलं, तेव्हा लखनऊ चा 62 रन्स वर 2 विकेट असा झाला होता.
कृनाल पंड्या ने ह्या सामन्यात निराश केलं
दीपक हुड्डा आउट झाल्यावर कृनाल पंड्या ने 17 बॉल्स मध्ये 18 रन्स केले त्याच्यासोबत असलेला के एल राहुल ने आपली खेळी चालू ठेवली होती, कृनाल पंड्याला कसिगो रबाडा ने शाहरुख खान कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर आलेला निकोलस पुरण भोपळा न फोडता आउट झाला,त्याला सुद्धा कसिगो रबाडा ने शाहरूख खान कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 14.3 ओव्हर्स मध्ये 111 रन्स वर 4 विकेट्स असा होता.
मार्कस स्टोईनीस ने आणि के एल राहूल ने डाव पुढे नेला
मार्कस स्टोईनीस ने 111 रन्स वर 4 विकेट्स पडलेल्या असतांना डाक सावरण्याचा प्रयत्न केला पण तोही अकरा बॉल्स मध्ये 15 रन्स करन आउट झाला,त्याला सॅम करणं ने जितेश शर्मा कडे कॅच देऊन आउट केले तिकडे के एल राहुल आपल्या अर्धशतकाच्या जवळ आलेला होता.
के एल राहूल ने केले 74 रन्स
![]() |
| PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21 |
सलामीला येऊन 19 व्या ओव्हर्स पर्यंत टिकून राहिलेला के एल राहुल ने 56 बॉल्स मध्ये 75 र स करून आपले कर्तव्य पार पाडले,त्याला अर्षदीप सिंग ने नॅथन एलिस कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा लखनऊ चा स्कोर 18.4 ओव्हर्स मध्ये 150 रन्स वर 6 विकेट्स असा होता.
लखनऊ सुपर जायन्ट्स ने दिले पंजाब किंग्स ला 160 रन्स च लक्ष
के एल राहुल आउट झाल्यावर 9 बॉल्स शिल्लक असतांना आयुष बदोनी 6 बॉल्स मध्ये 5 रन्स करून नाबाद राहिला,कृष्णाप्पा गौथम ने 2 बॉल्स मध्ये 1 रन केला,त्याला सॅम करणं ने सिकंदर रजा कडे कॅच देऊन आउट केले,युद्धविर सिंग भोपाळ न फोडता आउट झाला त्याला,त्याला सॅम करन ने शाहरुख खान कडे कॅच देऊन आउट केले,शेवटी रवी बिष्णोई 1 बॉल मध्ये 3 रन्स करून नॉट आउट राहिला.
पंजाब किंग्स ची सुरवात निराशाजनक
लखनऊ सुपर जायन्ट्स ने पंजाब किंग्स ला दिलेल्या 160 रन्स च्या टार्गेट ला पाठलाग करताना पंजाब किंग्स ची सुरवात अतिशय वाईट झाली, पहिल्या ओव्हर च्या तिसऱ्या बॉल वर ह्या सामन्यात शिखर धवन च्या जागी घेतलेला आणि सालामीला आलेला अथर्व तायडे भोपळा न फोडता तंबूत परतला तेव्हा पंजाब चा स्कोर 0 वर 1 आउट असा झाला होता,त्याला युद्धविर सिंग ने आवेश खान कडे कॅच देऊन आउट केले.त्यानंतर प्रभसीमरण सिग ने 4 बॉल्स मध्ये मात्र 4 रन्स केले त्याला युद्धविर सिंग ने क्लीन बोल्ड केले,तेव्हा पंजाव चा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 17 रन्स वर 2 विकेट असा झाला.
मॅथ्यू शॉर्ट आणि हरप्रित सिंग ने बाजू सावरली
17 रन्स वर पंजाब किंग्स च्या 2 विकेट पडल्यावर दबावात आलेले मॅथ्यू शॉर्ट आणि हरप्रित सिंग ने संयमी खेळी करत,संघाचा डाव सावरला आणि पंजाब किंग चा स्कोर 45 रन्स असताना मॅथ्यू शॉर्ट ने कृष्णाप्पा गौथम च्या बॉलिंगवर मार्कस स्टोईनीस कडे कॅच देऊन आपली विकेट गमावली आजी पंजाब किंग्स चा स्कोर 10.6 ओव्हर्स मध्ये 75 रन्स वर 3 विकेट असताना हरप्रित सिंग ने कृनाल पंड्या च्या बॉलिंग वर प्रेरक मानकंड कडे कॅच देऊन 22 बॉल्स मध्ये 22 रन्स करून आपली चौथी विकेट गमावली.
पाठोपाठ दोन विकेट्स पडल्या
एका साईड ला सिकंदर रजा बॅटिंग करत असताना दुसरीकडे सॅम करणं 6 बॉल्स मध्ये 6 रन्स आणि जितेश शर्मा ने 4 बॉल्स मध्ये 2 रन्स केले तेव्हा पंजाब चा स्कोर 15.5 ओव्हर्स मध्ये 122 रन्स वर 6 विकेट्स होत्या,तेव्हा पंजाब किंग्स ला जिंकायला 25 बॉल्स मध्ये 38 रन्स ची गरज होती.
सिकंदर रजा ने केले अर्धशतक
![]() |
| PBKS Vs LSG, Highlights,IPL 2023, Match 21 |
18व्या ओव्हर्स च्या पाचव्या बॉलवर सिकंदर रजा ने 41 बॉल्स मध्ये 57 रन्स करून आउट झाला,त्याला रवी बिष्णोई ने मार्कस स्टोईनीस कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा पंजाब किंग्स ला जिंकायला 13 बॉल्स मध्ये 21 रन्स ची गरज होती.
शाहरुख खान ने आणि हरप्रित ब्रार ने पंजाब ला जिंकून देण्यात मदत केली
पंजाब किंग्स ला 13 बॉल्स मध्ये 21 रन्स ची गरज असताना शाहरूख खान ने 10 बॉल्स मध्ये 23 रन्स करून आणि हरप्रित ब्रार ने 4 बॉल्स मध्ये 6 रन्स करन पंजाब ला विजय मिळवून दिला,शेवटी सामन्याची औपचारिकता बाकी असतांना हरप्रित ब्रार ने मार्क वूड च्या बॉलिंग वर निकोलस पुरण कडे कॅच देऊन आपली विकेट गमावली,तो पर्यंत सामना पंजाब च्या खिशात आला होता,शेवटी शाहरुख खान आणि कसिगो रबाडा नॉट आऊट राहिले,लखनऊ सुपर जायन्ट्स कडून युद्धविर सिंग,मार्क वूड आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर कृष्णाप्पा गौथम आणि कृनाल पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.आणि अश्या प्रकारे पंजाब किंग्स ने लखनऊ सुपर जायन्ट्स चा 3 वीकेट्स ने पराभव केला.
तुम्हाला आमचा आजचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा..धन्यवाद
शेठ हे पण वाचा:-
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले
- RajasthanRoyals Vs Chennai Super kingsCSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19,सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,SRH चा KKR वर 23 रन्सनी दणदणीत विजय,हॅरी ब्रूक चं धडाकेबाज शतक.
- RCB Vs DC,HIGHLIGHTS, IPL 2023,Match-20,रॉयल चॅलेंजर बंगलोर चा दिल्ली कॅपिटल वर 23 रन्सनी सहज विजय.



Post a Comment