LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय

 

LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय

LKN vs SRH कल झालेल्या TATA IPL 2023 मधल्या, लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद च्या 10 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायन्ट्स ने सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय मिळवला आहे.साडे तेरा करोड मध्ये सनरायसर्स हैद्राबाद ने विकत घेतला खेळादू आणि सनरायसर्स हैदराबाद चा कर्णधार एडन मर्कराम हा सपशेल अपयशी ठरला आहे, तो आल्याने संघाला बळ मिळेल अशी अपेक्षा होती पण तो काल पहिल्याच चेंडूवर शून्य रुन्स वर बाद झाला.त्यामुळे सर्व संघाची बाजू कमकुवत पडली आणि सनरायसर्स संघाला लखनऊ सुपर जायन्ट्स कडुन पराभवाचा सामना करावा लागला,सनरायसर्स हैदराबाद चा TATA IPL 2023 मध्ये सलग दुसरा पराभवाचा सामना करावा लागला आहे.त्यामुळे सनरायसर्स हैदराबाद चा संघ पॉइंट टेबल मध्ये सर्वात खाली शेवटी म्हणजे दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

LKN vs SRH TATA IPL 2023
LKN vs SRH TATA IPL 2023


LKN vs SRH TATA IPL 2023,
सनरायसर्स हैदराबाद चा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला


नाणेफेक जिंकून सनरायसर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार एडन मर्कराम याने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय संघाच्या पथ्यावर पडला आणि संघाचा पराभव झाला.


LKN vs SRH TATA IPL 2023सनरायसर्स हैदराबाद चं सुमार पप्रदर्शन


सनरायसर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करतांना ओपेनिंग ला आलेले अमोलप्रीत सिंग आणि मयंक अग्रवाल यांनी सुरवात धडाकेबाज केली खरी पण मयंक अग्रवाल ला कृनाल पंड्याने स्टोईनीस कडे झेल देऊन 8 रन्स वर बाद केले,त्यानंतर अमोलप्रीत सिंग बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला 31 रन्स वर कृनाल पंड्या ने LBW बाद करून तंबूत माघारी पाठवलं, नन्तर आलेल्या राहुल त्रिपाठीने मोर्चा सांभाळला पण तोही 34 धावा करून बाद झाला,त्याला यश ठाकूर ने अमित मिश्रा कडे झेल देऊन बाद केलं, मग नंतर हैदराबाद सनरायसर्स संघाचा सर्वात महागडा खेळादु आणि कर्णधार एडन मर्कराम आला आणि त्याला कृनाल पंड्या ने पहिल्याच बॉल मध्ये शुन्य वर क्लीन बोल्ड केलं,त्यापाठोपाठ आलेल्या हेरी ब्रूक ने फक्त 3 धावा काढल्या आणि त्याला रवी बिष्णोई ने निकोलस पुरण करवी स्टंपिंग करून बाद केलं,त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ने 16 रन्स केले, त्याला अमित मिश्रा ने दीपक हुड्डा कडे झेलबाद केले,अब्दुल समाद ने ताबडतोब 21 रन्स करून संघाच्या धावसंख्येत भर घातली,तो नॉट आऊट राहिला,शेवटी आदिल रशीद ने 4 धावा केल्या त्याला अमित मिश्रा ने दीपक हुड्डा कडे झेल बाद केलं आणि उमरान मलिक दीपक हुड्डा कडून धावबाद झाला आणि अश्याप्रकारे हैदराबाद सनरायसर्स ची धावसंख्या 121 वर 8 अशी राहिली.

LKN vs SRH TATA IPL 2023
LKN vs SRH TATA IPL 2023


LKN vs SRH TATA IPL 2023लखनऊ सुपर जायन्ट्स ने सोळाव्या ओव्हर मध्ये  पार केलं लक्ष


हैदराबाद सनरायसर्स संघाने लखनऊ सुपर जायन्ट्स संघाला दिलेल्या 121 धावांचा लक्षाचा पाठलाग करतांना लखनऊ सुपर जायन्ट्स संघाने 16 ओव्हर मध्ये लक्ष पार केलं, ओपेनिंग ला आलेले कायले मेयर आणि कर्नाधार के एल राहुल यांनी सावध सुरवात करत 43 धावांची पार्टनरशिप केली त्यात कायले मेयर ने 13 रन्स तर के एल राहुल ने 31चेंडूत 35 रन्स केले कायले मेयर ला फझलहक फारोकी ने मयंक अग्रवाल करवी झेल करून बाद केलं ते के एल राहुल ला आदिल रशीद ने LBW बाद केलं, त्यानंतर आलेल्या दिपक हुड्डा ला भुवनेश्वर कुमार ने कॉट अँड बोल्ड केलं, कृनाल पंड्या ने 23 चेंडूत 34 धावांची चांगली खेळी करत,त्याला उमरान मलिक ने अमोलप्रीत कडे झेल बाद देऊन बाद केलं.रोमॅरिओ शेफेर्ड शून्य धावांवर बाद झाला ,त्याला आदिल रशीद ने LBW बाद केलं,तर मार्कस स्टोईनीस ने 10 तर निकोलस पुरण ने 11 धावा केल्या आणि सोळाव्या ओव्हर मध्ये संघाला विजय मिळवून दिला. ते दोघे नॉट आऊट राहिले.

LKN vs SRH TATA IPL 2023
LKN vs SRH TATA IPL 2023


तर अश्याप्रकारे कालचा सामना झाला ,तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा...धन्यवाद
LKN vs SRH TATA IPL 2023


शेठ हे पण वाचा:-

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.