GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans वर Kolkata knight Riders ची धामाकेदार व्हिक्टरि.

 

GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने  Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट 

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13

GT vs KKR IPL 2023 नरेंद्र मोदी स्टेडियम,अहमदाबाद येथे होत असलेल्या Match मध्ये ,नाणेफेक जिंकून  प्रथम बॅटिंग करणाऱ्या Gujarat Titans कडून सलामीला आलेल्या वृद्धीमान सहा आणि शुभमन गिल यांनी Gujarat Titan ला खास अशी सुरवात करून दिली नाही, Gujarat Titans चा स्कोर 33 असताना वृद्धीमान सहा आऊट झाला, त्याला सुनील नारायण ने एन जगदिशन कडे कॅच देऊन 17 रन्सवर आउट केलं,33 वर एक विकेट पडली असताना तिकडे शुभमन गिल ने सावध खेळी चालू ठेवली,वृद्धीमान सहा आउट झाल्यानंतर वन डाऊन ला साई सुदर्शन आला, त्याच्यावर एक विकेट पडल्याने प्रचंड दबाव होता त्यामुळे तो पण संथ गतीने खेळू लागला,Gujarat Titans चा स्कोर 9 ओव्हर्स मध्ये 79 रन्स असताना,तेव्हा शुभमन गिल 30 तर साई सुदर्शन 20 वर खेळत होते, जस जसं ओव्हर्स संपत होत्या तस तसं शुभमन गिलने फटके मारणं चालू केलं होतं.


शुभमन गिल ने फटकेबाजी चालू केली आणि

शुभमन गिल ने फटकेबाजी चालू केली आणि Gujarat Titans चा रन्स चा आलेख वाढायला लागला 10 व्या ओव्हर्स मध्येशुभमन गिलने मारलेल्या एक चौकार च्या मंदतीने Gujarat Titans चा स्कोर 10 ओव्हर्स मध्ये 1 विकेट गमावून 88 रन्स झाला होता,आतापर्यंत Kolkata Knight Riders चे बॉलर्स वरून चक्रावर्तीची आणि सुयश शर्मा ची धुलाई झाली होती, वरून चकेअवर्ती ने 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 27 रन्स खर्च केले होते तर शार्दूल ठाकूर ने 1 ओव्हर मध्ये 12 रन्स मोजले होते.


लोकी फेर्गुसन ने 11 व्या ओव्हर मध्ये मात्र 3 रन्स दिले

शुभमन गिल आणि साई सुदर्शन ची फटकेबाजी चालू असताना मधेच फेर्गुसन ने त्यांच्या सुसाट वेगाला आळा घातला लोकी फेर्गुसन ने 11 व्या ओव्हर मध्ये मात्र 3 रन्स दिले तेव्हा Gujarat Titans चा स्कोर 11 ओव्हर्स मध्ये 1 विकेट गमावून 91 रन्स झाला होता,त्यावेळी शुभमन गिल 37 तर साई सुदर्शन 24 वर खेळत होता.


12 व्या ओव्हर्स मध्ये Gujarat Titans ला बसला दुसरा झटका

12 व्या ओव्हर्स मध्ये Gujarat Titans ला बसला दुसरा झटका शुभमन गिल च्या नावाने बसला 12 व्या ओव्हर्स च्या पहील्या बॉल मध्ये सुनील नारायण वला साई सुदर्शन एक गगनचुंबी सिक्स लावला आणि चौथ्या बॉल मध्ये सुनील नारायण ने शुभमन गिल ला 31 बॉल्स मध्ये 39 रन्स वर उमेश यादवी करवी कॅच देऊन आऊट केले.


शुभमन गिल नंतर आलेल्या अभिनव मनोहर ने येताबरोबर फटकेबाजी चालू केली

शुभमन गिल आउट झाल्यावर अभिनव मनोहर ने आल्याआल्या 13 व्या ओव्हर्सच्या पहिल्या तीन बॉल्स मध्ये चौकार ची हट्रिक लावली , त्यामुळे Gujarat Titans चा  स्कोर 13 ओव्हर्स मध्ये 2 विकेट गमावून 115 रन्स झाला होता, तेव्हा साई सुदर्शन 35 तर अभिनव मनोहर 14 वर खेळत होता.


हळूहळू Gujarat Titans वर दबाव वाढत होता

2 विकेट गमावल्यानंतर Gujarat Titans चा स्कोर मंदावला होता,हट्रिक चौकार मारल्यानंतर पुढच्या 7 बॉल्स मध्ये फक्त 4 रन्स निघाले होते,साई सुदर्शन चा फॉर्म मागच्या मॅचप्रमाणेआतपर्यंत कायम होता, त्यामुळे Gujarat Titans ने सुटकेचा श्वास घेतला होता, मात्र अचानक अभिनव मनोहर 14 रन्स करून आउट झाला आणि Gujarat Titans च्या प्रेक्षकांची धाकधूक वाढली.त्याला सुयश शर्मा ने क्लीन बोल्ड केले, तोपर्यंत Gujarat Titans चा स्कोर 14 व्या ओव्हर्स मध्ये 119 वर 3 विकेट असा झाला होता,आता पर्यंत Kolkata Knight Riders कडून सुनील नारायण ने 3 ओव्हर्स मध्ये 25 रन्स खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या तर सुयश शर्मा ने ,3 ओव्हर्स मफहे 21 रन्स देऊन 1 विकेट घेतली होती.


शेवटचे 6 ओव्हर्स बाकी असतांना विजय शंकर खेळायला आला

अभिनव मनोहर नंतर विजय शंकर खेळायला आला तेव्हा साई सुदर्शन आणि विजय शंकर वर दबाव स्पष्ट जाणवत होता.तिकडे साई सुदर्शन ने आपली सावध खेळी सुरू ठेवली होती,मात्र आता फटकेबाजी केल्याशिवाय साई सुदर्शन ला पर्याय नव्हता,त्यामुळे त्याने 15 ओव्हर्स च्या दुसऱ्या बॉल ला शार्दूल ठाकूर च्या बॉलवर चौकार मारला.त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.ड्रिंक्स पर्यंत Gujarat Titans व्हा स्कोर 144 वर 3 विकेट असा होता.


साई सुदर्शन ने मारले अर्धशतक

ड्रिंक्स नंतर लोकी फर्ग्युसन ने घेतलेल्या 17 व्या ओव्हर्स मध्ये दुसऱ्या बॉल वर एक रन काढून साई सुदर्शन ने आपले अर्धशतक करून आपला जलवा कायम ठेवला असतांना 18 व्या ओव्हर्स च्या तिसऱ्या बॉल मध्ये सुनील नारायण ने साई सुदर्शन ला अनुकूल रॉय कडे कॅच देऊन आउट केलं,त्यानंतर डेथ ओव्हर्स ची जबाबदारी साई सुदर्शन च्या जागी आलेल्या डेव्हिड मिलर आणि विजय शंकर वर आली.

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13


विजय शंकर ने केली शेवटच्या ओव्हर्स मध्ये धामाकेदार खेळी

शेवटच्या दोन व्हर्समध्ये विजय शांकर Kolkata Knight Riders चया बॉलर्स साठी कर्दनकाळ ठरला शेवटच्या दोन ओव्हर्स मध्ये विजय शंकर ने जवळपास 45 च्या वर रन्स चोपुन 21 बॉल्स मध्ये आपले अर्धशतक केले, 20 व्या ओव्हर्स च्या तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या बॉल मध्ये शार्दूल ठाकूर ला सिक्सर ची हट्रिक विजय शंकर ने लावली आणि संघाला 204 चा मोठा टप्पा गाठून दिला.

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13


Kolkata Knight Riders कडून सुनील नारायण ने घेतल्या सर्वाधिक 3 विकेट

सुनील नारायण ने मात्र आपल्या जादुई फिरकीने Gujarat Titans च्या प्लेयेर्स ला सचांगलाच अंकुश लावला होता , त्याने वृद्धीमान सहा,शुभमन गिल आणि साई सुदर्शन या खेळाडूंच्या 4 ओव्हर्स मध्ये 33 रन्स च्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या.

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13


Kolkata Knight Riders ला Gujarat Titans ने दिलं 205 रन्स च टार्गेट


शुभमन गिल, साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर आणि विजय शंकर च्या शेवटच्या ओव्हर्स मध्ये केलेल्या फटकेबाजी च्या जोरावर Gujarat Titans ने Kolkata Knight Riders ला 205 धावांचा मोठा टार्गेट दिला आहे.


Gujarat Titans ने दिला 205 धवांचा टार्गेट

टार्गेट चा पाठलाग करतांना Kolkata Knight Riders ची सुरवात मात्र अडखडत झाली, सालामीला आलेले आर गुरबाज आणि नारायण जगदिशन हे झटपट बाद झाल्याने,Kolkata Knight Riders च्या प्रेक्षकांमध्ये नाराश्यचं वातावरण झालं होतं,Kolkata Knight Riders चा स्कोर 20 रन्स असताना मोहम्मद शमी ने यश दयाल कडे कॅच देऊन आर गुरबाज ला 15 रन्स वर आउट केले, दुसऱ्या एन्ड वर असलेला  नारायण जगदीशन ला पण काही करता आलं। नाही, त्याला जोशुआ लिटल ने टीम चा स्कोर 28 वर असताना नारायण जगदिशन ला 6 रन्स वर आउट केलं, त्याचा कॅच अभिनव मनोहर ने पकडला,Kolkata Knight Riders चा स्कोर 28 वर 2 विकेट असताना.


स्टेडियम वर आले अवतरले दोन महारथी

Kolkata Knight Riders चे 28 वर 2 विकेट असतांना वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी संघाची बाजू लावून धरली आणि तुफान फटकवबाजी करत Gujarat Titans च्या बॉलर्स ना सळो की पळो करून सोडलं तेव्हा 29 बॉल्स मध्ये नितेश राणा ने 45 रन्स करून आपली विकेट 128 वर गमावली,त्याला  अलझारी जोसेफ ने मोहम्मद शमी कडे कॅच देऊन आउट केलं,तेव्हा वेंकटेश अय्यर, धुव्वाधार 30 बॉल्स मध्ये 64 रन्स करून नाबाद खेळत होता,नितेश राणा आउट झाला तेव्हा Kolkata Knight Riders चा स्कोर 13 ओव्हर्स मध्ये 128 वर 3 असा होता.

Kolkata Knight Riders ला जिंकायला 34 बॉल्स मध्ये 70 रन्स ची गरज होती
पिचवर वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग खेळत होते आतापर्यंत वेंकटेश अय्यर चे 34 बॉल्स मध्ये 69 रन्स झालेले होते आणि रिंकू सिंग 2 रन्स वर खेळत होता.


ड्रिंक्स पर्यंत KKR चा स्कोर 149 वर 3 आउट होता

ड्रिंक्स पर्यंत KKR चा स्कोर 15 ओव्हर्स मध्ये 149 वर 3 आउट असा झालेला होता जिंकायला 30 बॉल्स मध्ये 56 रन्स ची गरज Kolkata Knight Riders पाहिजे होती,तेव्हा वेंकटेश अय्यर 37 बॉल्स मध्ये 79 रन्स वर खेळत होता ते रिंकू सिंग 5 बॉल्स मधे 2 रन्स वर खेळत होता.आता पर्यंत  मोहम्मद शमी,जोशुआ लिटल आणि अलझारी जोसेफ ने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती, वेंकटेश अय्यर ची फटकेबाजी सुरूच होती.16 व्या ओव्हर मध्ये अय्यर ने जोसेफ ला चौकार ठोकला.


83 रन्सची फटकेबाजी करून वेंकटेश अय्यर आऊट झाला

मॅच मध्ये रंगत वाढत असताना ड्रिंक्स नंतर 16 व्या ओव्हर मध्ये 5 बॉल वर अलझारी जोसेफ ने वेंकटेश अय्यर ची विकेट घेतली, त्याची कच शुभमन गिल ने पकडली.वेंकटेश अय्यर ने त्याचं काम चोख बजावलं आणि 40 बॉल्स मध्ये 83 रन्स करून तंबूत परतला.

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13


आता मोर्चा आंद्रे रसेल ने सांभाळला होता

वेंकटेश अय्यर च्या जागी आलेल्या आंद्रे रसेल ने सावध खेळी करत विकेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चालू होता,आता जिंकण्यासाठी Kolkata Knight Riders ला 23 बॉल्स मध्ये 50 रन्स पाहिजे होते,रनरेट मध्ये तफावत होत चालली होती,रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल वर दबाव वाढत असताना रशीद खान ने आंद्रे रसेल ला 1 रन्स वर तंबूत माघारी पाठवलं.


KKR वर  जिंकण्यासाठी दबाव वाढत चालला होता

त्यानंतर आलेल्या सुनील नारायण ही आंद्रे रसेल पाठोपाठ शून्यावर माघारी परतला त्याला लन रशीद खान ने माघारी पाठवलं आणि नंतर आलेल्या शार्दूल ठाकुर लगातार आउट करत रशीद खान ने हट्रिक घेतली,शार्दूल ठाकूर ला रशीद खान ने शून्य वर बोल्ड केलं.


आता KKR ची स्थिती बिकट झाली होती

KKR सहजच जिंकून जाईल असं वाटत असतांना रशीद खान ने 3 विकेट ची हट्रिक घेतल्यावर,KKR ची स्थिती नाजूक झालेली होती, प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण झालेलं होतं तेव्हा Kolkata Knight Rider चा स्कोर 17 ओव्हर्स मध्ये 157 वर 7 विकेट असा होता.


KKR ला जिंकायला 18 बॉल्स मध्ये 47 रन्स ची गरज

पिच वर रिंकू सिंग आणि उमेश यादव खेळत होते, आता जवळपास KKR च आव्हान संपुष्टात आले होते, रिंकू सिंग आणि उमेश यादव यांच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट दिसत होता.दोघे एकमेकांना सिंगल ची strike देण्याचा प्रयत्न करत होते, आता 12 बॉल्स मध्ये 43 रन्स ची गरज KKR ला होती.


शेवटच्या ओव्हर मध्ये KKR ला 29 रन्स ची गरज होती

19 व्या ओव्हर मध्ये एक सिक्स आणि एक फोर मारून वातावरण तापवलं आणि शेवटच्या ओव्हर मध्ये यश दयाल ला रिंकू सिंग ने लगातार 4  सिक्स मारून KKR च्या आशा पल्लवित केल्या, शेवटच्या 1 बॉल मध्ये KKR ला 4रन्स ची गरज होती, मॅच रोमांचक मोड मध्ये आलेली होती,शेवटच्या बॉल मध्ये रिंकू सिंग ने 6 मारून, KKR ला मॅच जिकनू दिली.


रिंकू सिंग ने मारले शेवटच्या ओव्हर मध्ये 5 सिक्स


यश दयाल ला दिलेली शेवटची ओव्हर Gujarat Titans ला महाग पडली, सामना एक हाती GT च्या हाती येईल असं वाटत असताना रिंकू सिंग ने तुफान खेळी करत 6 बॉल मध्ये 5 सिक्स मारून KKR ला मॅच जिंकून दिली .

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13


रशीद खान ने घेतली हट्रिक

रशीद खान ने आंद्रे रसेल,सुनील नारायण आणि शार्दूल ठाकूर ला आउट करत IPL 2023 मधली पहिली हट्रिक घेतली, त्याबदल्यात त्याने 37 रन्स खर्च केले,मात्र त्याची हट्रिक संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

GT vs KKR IPL 2023 Match 13
GT vs KKR IPL 2023 Match 13

GT vs KKR IPL 2023 Match 13


शेठ हे पण वाचा:-













No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.