Rinku Singh-रिंकू सिंग KKR,सफाई कामगार ते IPL चा स्टार खेळाडू
Rinku Singh-रिंकू सिंग KKR,सफाई कामगार ते IPL चा स्टार खेळाडू IPL 2023
![]() |
| Rinku Singh-रिंकू सिंग KKR |
Rinku Singh-रिंकू सिंग KKR लहानपणापासूनच क्रिकेट ची आवड असणाऱ्या रिंकू सिंग ची परिस्थिती हालाकीची होती, वडील गॅस सिलिंडरची रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा खर्च भागवत होते, पण तुटपुंजी पैश्याने घर चालणं अवघड झालं होतं. क्रिकेट ची आवड असणारा रिंकू सिंग मात्र मैदानावर जाऊन क्रिकेट खेळायचा, त्याला आपल्या परिस्थिती ची जाणीव होती, पुढे त्याला मोहम्मद जिशान यांनी बॅट घेऊन दिली,कोचिंगसाठी पैसे नव्हते तर त्याला मसूद अमीन यांनी मोफत प्रशिक्षण दिलं होतं.
S-Sreesanth-एस-श्रीसंथ ...नावात जरी संथ असला तरी बॉलिंग चा वेग मात्र सुसाट होता
रिंकू सिंग चा संघर्षमय खडतर प्रवास-Rinku Singh-रिंकू सिंग KKR IPL 2023
रिंकू सिंग आपल्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी साठी क्रिकेट खेळायला लागला आणि तिथे मिळणाऱ्या मानधनातुन आलेल्या कमाईवर तो आपल्या वडिलांना कर्ज फेडण्यासाठी मदत करायचा, पुढे जाऊन त्याला सफाई कामगार म्हणून सुद्धा ऑफर आली होती, पण त्याला क्रिकेट च्या आवडीमुळे त्याने प्रयत्न सोडला नाही आणि IPL मध्ये 20 लाखंच्या अपेक्षा असलेल्या रिंकू सिंग ला कोलकाता नाईट रायडर्स च्या शाहरूख खान ने त्याला 80 लाख देऊन खरेदी केले.
कालच्या मॅच मध्ये बनला स्टार-Rinku Singh-रिंकू सिंग KKR IPL 2023
काल झालेल्या Gujarat Titans विरुद्ध Kolkata Knight Riders मध्ये झालेल्या सामन्यात Gujarat Titans ने दिलेल्या 205 रुन्स च्या टार्गेट चा पाठलाग करताना KKR कडून खेळतांना वेंकटेश अय्यर ने केलेल्या खेळी मुळे Kolkata Knight Riders सामना जिंकून जाईल असं वाटत असतांना रशीद खान ने 3 विकेट घेऊन हॅट्रिक घेतली आणि सामना फिरला आणि Gujarat Titans चं पारडं जड झालं.
रिंकू सिंग ने फिरवला सामना-Rinku Singh-रिंकू सिंग KKR IPL 2023
रशीद खान ने 3 विकेट घेऊन हॅट्रिक घेतल्यानंतर सामना जवळपास Kolkata Knight Riders च्या हातून निसटला असं वाटत असतांना,शेवटच्या ओव्हर मध्ये KKR ला जिंकण्यासाठी 29 रन्स ची गरज होती.तेव्हा रिंकू सिंग शेवटच्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉल वर strike वर आला आणि त्याने एकामागे एक 5 सिक्सर लावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि हरण्यात जमा असलेला सामना रिंकु सिंग ने आपल्या कडे ओढून आणला.
शाहरूख ने लिलावात घेतल्याचे फळ मिळालं-Rinku Singh-रिंकू सिंग KKR IPL 2023
![]() |
| Rinku Singh-रिंकू सिंग KKR |
लिलावात कोणताही संघ रिंकू सिंग वर बोली लावत नव्हता पण ऐनवेळी शाहरुख ने त्याला आपल्या संघात 80 लाखाला खरेदी केला आणि त्याचं नशीब बदललं. त्याचं त्याने सोनं करून दाखवले.
Paul ValthatyIPL मध्ये शतक ठोकून रातोरात उजेडात येणार हा तारा नक्की कुठे गायब झाला
भाऊ-बहिणीचं लग्न करायचय आणि छोटे घर घ्यायचंच-Rinku Singh-रिंकू सिंग KKR IPL 2023
आलेल्या पैशातून आता तो त्याचा भाऊ आणि बहिणीचं लग्न करणार आहे आणि एक घर सुद्धा घेणार आहे, आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळालं असं तो म्हणतो.
![]() |
| Rinku Singh-रिंकू सिंग KKR |
तर तुम्हाला आमचा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा...धन्यवाद
Rinku Sing-रिंकू सिंग KKR IPL 2023



Post a Comment