S-Sreesanth-एस-श्रीसंथ ...नावात जरी संथ असला तरी बॉलिंग चा वेग मात्र सुसाट होता
![]() |
| S-Sreesanth-एस-श्रीसंथ |
S-Sreesanth-एस-श्रीसंथ...नावात जरी संथ असला तरी त्याचा वेग मात्र सुसाट होता
लहानपनापासूनच आगाऊ, गल्लीतल्या मुलांशी नेहमी भांडत असणारा, तेव्हा भारतीय संघात नुकताच पदार्पण केलेला, केरळ चा शांताकुमारन श्रीसंथ नायर म्हणजेच एस श्रीसंथ ची T20 World Cup 2007 पण निवड झाली होती, श्रीसंथची ओळख आता पर्यंत फक्त एस श्रीसंथ एवढीच होती, लहान असताना त्याला खरंतर श्रीसंथ हा फिरकीपटू होता, पुढे जाउन त्याचं रूपांतर मध्यम फास्ट बॉलर म्हणून झालं, मग तेव्हा पाकिस्तान सोबत सामना असला की श्रीसंथ आणि पाकिस्तानी खेळाडू यांना दिवचण लोकांना जास्त उत्सुकतेचे वाटू लागले, पाक खेळाडूंना दिवचण, मुख्य म्हणजे शोएब अखतर सोबतचा राडा म्हणजे जणू प्रेक्षकांसाठी मेजवानीच असायची. वर्ष होतं 2007 चं, जेव्हा दक्षिण आफ्रिकेत पहिल्या T20 World Cup स्पर्धेचं आयोजन केले गेलं होतं. तेव्हा इतर संघांप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा ताफा पण दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता, एकंदरीत सर्व संघ पहिल्या T20 World Cup मध्ये खेळायला आतुर झाले होते.
तेव्हा भारतीय संघात नुकताच पदार्पण केलेला, केरळ चा शांताकुमारन श्रीसंथ नायर म्हणजेच एस श्रीसंथ ची पण निवड झाली होती.S-Sreesanth-एस-श्रीसंथ
T20 World Cup वर्ल्ड कप चा थरार चालू झाला होता, मग लगेच डोळ्यासमोर येतं ते युवराज सिंग चे लक्षात राहिलेले इंग्लंड विरूद्ध चे स्टुअर्ट ब्रॉड च्या 6 चेंडूवर 6 गगनभेदी छक्के मारलेल, पण खऱ्या अर्थाने T20 World Cup गाजवला तो एस श्रीसंथने, त्याच्या बॉलिंग पेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बाद केल्यानंतर, त्यांना उकसवण, त्यांना बाद केल्यानंतर हातवारे करणं, जमीनीवर दोघे हात आपटणं जे एखाद्या थ्रिलर सिनेमाला लाजवेल असंच होतं.
Paul ValthatyIPL मध्ये शतक ठोकून रातोरात उजेडात येणार हा तारा नक्की कुठे गायब झाला
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना झाला तेव्हा -S-Sreesanth-एस-श्रीसंथ
तेव्हा 22 सप्टेंबर 2007 रोजी ऑस्ट्रेलियाचा विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सेमिफायनल मध्ये सलामीला खेळायला आलेले ऍडम गिलख्रिस्ट आणि म्याथ्यू हेडन यांनी धडाकेबाज सुरुवात केली खरी पण सहाव्या ओव्हर च्या पहिल्याच बॉल वर श्रीसंथ ने 22 रन्स वर खेळत असलेल्या ऍडम गिलख्रिस्ट चा त्रिफळा उडवला आणि श्रीसंथ च सेलिब्रेशन चालू झालं, अख्ख्या मैदानावर थ्रिलर सिन चालू झाला. त्याचं गिलख्रिस्ट समोर थैय्या थैय्या करणं प्रेक्षकांना जाम आवडत होतं, पण तो इथेच थांबला नाही मग पंधराव्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर हेडन चा सुद्धा त्रिफळा सुरू झाला मग श्रीसंथ ने नुसता जश्न च मनवलं नाही तर हेडन च्या डोळ्यात डोळे घालुन त्याला अक्षरशः घालून पाडून डिवचले, हेडन ला ही पश्चाताप होत असेल की कोणाच्या हातून आपण आउट झालो ते.मग पुढे जाऊन भारताला फायनल मध्ये घेऊन जाण्यात आणि फायनल जिंकून देण्यात श्रीसंथ चा मोठा वाटा आहे ,पुढे जाऊन IPL 2008 च्या अतिउताववीळपणामुळे श्रीसंथ ला मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब च्या सामन्यात हरभजन सिंग ने कानफटात लावली ते प्रकरण ही खूप गाजलं होतं, मग काही वर्षांनी IPL 2012 ला मॅच स्पॉट फिक्सिंग च्या आरोपाखाली श्रीसंथ ला शिक्षा आणि आजीवन बंदी घालण्यात आली होती कालांतराने ती उठवली गेली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
![]() |
| S-Sreesanth-एस-श्रीसंथ |
तुम्हाला आमचा लेख कसा वाटला कमेंट,शेअर, करून नक्की कळवा...धन्यवाद
S-Sreesanth-एस-श्रीसंथ
Rinku Singh-रिंकू सिंग KKR,सफाई कामगार ते IPL चा स्टार खेळाडू



Post a Comment