RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,रॉयल चॅलेंजर बंगलोर चा दिल्ली कॅपिटल वर 23 रन्सनी सहज विजय.

 RCB Vs DC,HIGHLIGHTS, IPL 2023,Match-20,रॉयल चॅलेंजर बंगलोर चा दिल्ली कॅपिटल वर 23 रन्सनी सहज विजय.

RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,
RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,

RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,एम ए चिंनास्वामी स्टेडिउम, बेंगलोर येथे झालेल्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर बंगलोर ने दिल्ली कॅपिटल वर 23 रन्सनी सहज विजय मिळवला आहे, नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून सलामीला आलेले विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी रॉयल चॅलेंजर ला चांगली सुरवात करून दिली पण फाफ डू प्लेसिस ला मोठी खेळी करता आली नाही तो 16 बॉल्स मध्ये 22 रन्स करून तंबूत परतला,त्याला मिचेल मार्श ने अमन खान कडे कॅच देऊन आउट केले.फाफ डू प्लेसिस आउट झाला तेव्हा बंगलोर चा स्कोर 4.4 ओव्हर्स साधे 42 वर 1 आउट असा होता.


विराट कोहली ने केली फिफ्टी


RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,
RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,

फाफ डू प्लेसिस आउट झाल्यावर खेळायला आलेला महिपाल लोमरार सोबत खेळी करून विराट कोहली ने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्यानंतर बेंगलोर चा स्कोर 10.1 ओव्हर्स मध्ये 89 असतांना विराट कोहली ने आपली विकेट गमावली, तो 34 बॉल्स मध्ये 50 रन्स करून आउट झाला,त्याला ललित यादव ने यश धुल कडे कॅच देउन आउट केले.


ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरार ने डाव सावरला

विराट कोहली आउट झाल्यावर ग्राऊंडवर खेळायला आलेला ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि बेंगलोर चा स्कोर 100 च्या पार नेला,मात्र 12.3 ओव्हर्स मध्ये बेंगलोर चा स्कोर 117 रन्स असतांना महिपाल लोमरार ने आपली विकेट फेकली, त्याने 18 बॉल्स मध्ये 26 रन्स केले,त्याला मिचेल मार्श ने अभिषेक पोरेल कडे कॅच देऊन आउट केले.


हर्षल पटेल,ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक पाठोपाठ आउट झाले

रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 13.6 ओव्हर्स मध्ये 132 रन्स वर 3 विकेट असताना, 132 रन्स वर  बेंगलोर  कडून हर्षल पटेल,ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक ने  आपली चौथी, पाचवी आणि सहावी विकेट गमावली तेव्हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा स्कोर 132 वर 7 विकेट्स असा झाला,तेव्हा हर्षल पटेल ने 4 बॉल्स मध्ये 6 रन्स केले, त्याला अक्षर पटेल ने अभिषेक पोरेल कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ने 14 बॉल्स मध्ये 24 रन्स करून त्याला कुलदीप यादव ने डेव्हिड वॉर्नर कडे कॅच देऊन आउट केले आणि दिनेश कार्तिक भोपळा सुद्धा न फोडता तंबूत परतला, त्याला कुलदीप यादव ने ललित यादव कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा बंगलोर चा स्कोर 14.2 ओव्हर्स मध्ये 132 रन्सवर 6 विकेट्स असा होता.


लोवर ऑर्डर च्या प्लेयर्सनी डाव सावरला

132 रन्सवर 6 विकेट पडल्यावर खेळायला आलेले शहबाज अहमद आणि अनुज रावत यांनी लोवर ऑर्डर ला येऊन बेंगलोर चा स्कोर 150 च्या पार नेऊन 20 ओव्हर्स पर्यंत नॉटआऊट राहून बेंगलोर ला 174 रन्सचा टार्गेट उभा करून दिला, शहबाज अहमद ने 12 बॉल्स मध्ये 20 रन्स केले आणि अनुज रावत ने 22 बॉल्स मध्ये 15 रन्स केले.


रॉयल चॅलेंजर ने दिले दिल्ली कॅपिटल ला 175 रन्सचं लक्ष

रॉयल चॅलेंजर बंगलोर ने दिल्ली कॅपिटल ला दिलेल्या 175 रन्सचा पाठलाग करतांना दिल्ली कॅपिटल ची सुरवात खूपच निराशाजनक झाली, दिल्ली कॅपिटल कडून सलामीला बॅटिंग करायला आलेले कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यापैकी पृथ्वी शॉ ची फ्लॉप ची मालिका कायम आहे, तो कालच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात परत एकदा फ्लॉप झाला,तो पहिल्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर शून्यावर रनआउट झाला,त्याला अनुज रावत ने रनआउट केले.तेव्हा दिल्ली कॅपिटल चा स्कोर 1 रन वर 1 आउट असा होता.


मिचेल मार्श आणि यश धुल ने केली निराशा

पृथ्वी शॉ रनआउट झाल्यावर त्याच्याजागी खेळायला आलेला मिचेल मार्श सुद्धा आपले खाते न खोलता तंबूत परतला,त्याने 4 बॉल्स खाऊन शून्य रन केले, त्याला वेन पारनेल ने विराट कोहली कडे कॅच देऊन आउट केले आणि त्यापाठोपाठ आलेला यश धुल ने 4 बॉल मध्ये फक्त 1 रन केला आणि तोही माघारी तंबूत परतला, त्याला मोहम्मद सिराज ने LBW  आउट केले,तेव्हा दिल्ली कॅपिटल चा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 2 रन्स वर 3 विकेट पडले.


डेव्हिड वॉर्नर ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला

2 रन्स वर दिल्ली कॅपिटल च्या 3 विकेट पडल्यावर दिल्ली कॅपिटल चा कर्णधार डेव्हिड वार्नर ने मनीष पांडेसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण सहाव्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर डेव्हिड वॉर्नर ची विकेट गेली ,त्याने 13 बॉल्स मध्ये 18 रन्स केले, त्याला वैशक विजय कुमार ने विराट कोहली कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा दिल्ली कॅपिटल चा स्कोर होता 30 रन्स वर 4 विकेट.


मनीष पांडे ची फिफ्टी


RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,
RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,

डेव्हिड वॉर्नर आउट झाल्यावर खेळायला आलेल्या अभिषेक पोरेल,अक्षर पटेल सोबत थोड्याफार रन्सची भागीदारी करून मनीष पांडे ने आपले अर्धशतक पूर्ण केले,अभिषेक पोरेल ने 5 बॉल्स मध्ये 8 रन्स केले,त्याला हर्षल पटेल ने वेन पारनेल कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर आलेला अक्षर पटेल ने थोडी फटकेबाजी करून 14 बॉल्स मध्ये 21 रन्स केले मात्र ते जिंकण्यासाठी पुरेसे नव्हते त्याला वैषक विजय कुमार ने मोहम्मद सिराज कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर मनीष पांडे  38 बॉल्स मध्ये करून माघारी परतला, त्याला वणींडू हसरंगा ने LBW आउट केले. तेव्हा दिल्ली कॅपिटल चा स्कोर 14 ओव्हर्स मध्ये 98 रन्स वर 7 विकेट्स असा होता.


दिल्ली कॅपिटल ला 36 बॉल्स मध्ये 75 रुन्स जिंकायला लागणार होते

98 ररुन्स वर 7 विकेट गेल्यानंतर दिल्ली कॅपिटल ला 36 बॉल्स मध्ये 75 रन्स ची गरज असताना अमन खान आणि ललित यादव खेळत होते ,तेव्हा ललित यादव ने दिल्ली। हा स्कोर 110 रन्स असताना आपली आठवी विकेट दिली,त्याने 7 बॉल्स मध्ये 4 रन्स केले,त्याला वैषक विजय कुमार ने ग्लेन मॅक्सवेल कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर अमन खान ने थोडी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही 10 बॉल्स मध्ये 18 रन्स करून बाद झाला,त्याला मोहम्मद सिराज ने विराट कोहली कडे कॅच देऊन आऊट केले, तेव्हा दिल्ली ला जिंकायला 15 बॉल्स मध्ये 47 रन्स हवे होते.


शेवटच्या ओव्हर्स मध्ये नोर्जे ने केली फटकेबाजी

शेवटच्या ओव्हर्स मध्ये दिल्ली कॅपिटल ला जिंकण्यासाठी 15 बॉल्स मध्ये 47 रन्स ची गरज असतांना आणि शेवटची विकेट शिल्लक असताना ग्राउंड वर अँरीच नोरजे आणि कुलदीप यादव खेळत होते,तेव्हा नोर्जे ने फटकेबाजी करत 14 बॉल्स मध्ये 23 रन्स केले आणि कुलदीप यादव ने 6 बॉल्स मध्ये 7 रन्स केले,मात्र ते 20 ओव्हर्स मध्ये दिल्ली कॅपिटल ला जिंकवून देऊ शकले नाही,ते दोघेही नाबाद राहिले,दिल्लीचा स्कोर 151 रन्स पर्यंतच मजल मारू शकला आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर ने 23 रन्सनी सामना जिंकला ,तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर कडून वैषक विजयकुमार ने 3 विकेट तर मोहम्मद सिराज ने 2 विकेट्स तर वणींडू हसरंगा, वेन पारनेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आणि दिल्ली कॅप7 कडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यानी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेल ललित यादव ने प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.


RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,
RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20,


तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा...धन्यवाद


RCB Vs DC,HIGHLIGHTS,IPL 2023,Match-20




शेठ हे पण वाचा:-
            






No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.