RR vs CSK IPL 2023 Highlights Scorecard IPL 2023 Points Table, राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स चा 32 रन्सनी उडवला धुव्वा

 RR vs CSK IPL 2023 Highlights Scorecard IPL 2023  राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स चा 32 रन्सनी उडवला धुव्वा.

RR vs CSK
RR vs CSK

आज IPL 2023 च्या 16 व्या हंगामातील, सवाई मानसिंग स्टेडियम,जयपूर येथे झालेल्या RR vs CSK या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स चा 32 रन्सनी उडवला धुव्वा



राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नई सुपर किंग्स ला प्रथम क्षेत्ररक्षण करायला सांगितले,कर्णधार संजू सॅमसन ने प्रथम फलंदाजी करण्यावर विश्वास व्यक्त केला होता.



RR vs CSK: प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्स ची सुरवात अतिशय धडाकेबाज झाली, राजस्थान रॉयलकडून सलामीला आलेले, यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी राजस्थान रॉयल्स ला चांगली सुरवात करून दिली, यशस्वी जयस्वाल ने पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये चेन्नई सुपर किंग्स च्या गोलंदाज ना सळो की पळो करून सोडलं होतं.आकाश सिंग ने तर फक्त 2 ओव्हर्स मधे 32 रन्स बहाल केले.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: राजस्थान रॉयलकडून कडून सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल ने राजस्थान रॉयल्स चा स्कोर 4 ओव्हर्स मध्ये 45 वर नेला आणि स्वतःचा स्कोर 14 बॉल्स मध्ये 6 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 31 रन्स वर नेला, त्याने आकाश सिंग ची धूलाई केली होती, तिकडे जोस बटलर ने 11 बॉल्स मध्ये 2 चौकार च्या मदतीने 14 रन्स केले होते, पाचव्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वाल ने तुषार देशपांडे च्या गोलंदाजीवर उत्तुंग असा षटकार मारला होता आणि राजस्थान रॉयल्स चा स्कोर पन्नास च्या वर नेला होता.राजस्थान रॉयल्स चे 5 ओव्हर्स मध्ये 52 रन्स वर शून्य  आउट असा होता.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: यशस्वी जयस्वाल प्रमाणे जोस बटलर पण मोठ मोठे शॉर्टस खेळत होता, मात्र मोठे शॉर्टस खेळण्याच्या नादात जोस बटलर ने आपली विकेट गमावली, त्याने 21 बॉल्स मध्ये 4 चौकार च्या मदतीने त्याने 27 रन्स केले, त्याला रविंद्र जडेजा ने शिवम दुबेकडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा राजस्थान रॉयल चा स्कोर  8.2 ओव्हर्स मध्ये 82 रन्सवर 1 विकेट असा होता.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: जोस बटलर आउट झाल्यावर त्याच्याजागी खेळायला आलेला राजस्थान रॉयल्स चा कर्णधार आज अपयशी ठरला आहे, त्याने 17 बॉल्समध्ये 1 चौकार च्या मदतीने मात्र 17 रन्स केले, त्याला तुषार देशपांडे ने  ऋतुराज गायकवाड कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 13.1 ओव्हर्स मध्ये 125 रन्सवर 2 विकेट्स असा होता.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: राजस्थान रॉयल चे 125 रन्सवर 2 विकेट्स पडलेले असतांना, सालामीला खेळायला आलेला यशस्वी जयस्वाल ने शानदार खेळी करत 43 बॉल्समध्ये 8 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार च्या मदतीने 77 रन्स केले, त्याला तुषार देशपांडे ने अजिंक्य रहाणे कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 13.5 ओव्हर्स मध्ये 132 रन्स वर 3 विकेट्स असा होता.



RR vs CSK: राजस्थान रॉयल्स च्या 132 रन्सवर 3 विकेट्स असतांना, मैदानात खेळायला आलेले विस्फोटक फलंदाज शिमरोन हेतमायर आणि ध्रुव जुरेल खेळत होते तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 16 ओव्हर्स मध्ये 146 वर 3 विकेट्स असा होता, तेव्हा शिमरोन हेतमायर 8 रन्सवर असतांना आउट झाला, त्याने एकही चौकार किंवा षटकार ची मदत न घेता 10 बॉल मध्ये 8 रन्स केले, तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 16.2 ओव्हर्स मध्ये 146 वर 4 विकेट्स असा होता.त्याला महेश थिकसना ने बोल्ड केले.



RR vs CSK

RR vs CSK: डेथ ओव्हर्स मध्ये खेळायला आलेले धृव जुरेल आणि देवदत्त पदिक्कल वर राजस्थान रॉयल्स चा स्कोर पुढे नेण्याची मोठी जबाबदारी होती, मात्र त्या दोघांवर दबाव स्पष्ट दिसत होता, दोघेही अडखळत चेन्नई सुपर किंग्स च्या गोलंदाजांचा सामना करत होते, धृव जुरेल 8 बॉल्स मध्ये 1 चौकार च्या मदतीने 11  रन्सवर खेळत होता तर देवदत्त पदिक्कल 5 बॉल्स मध्ये 1 चौकार च्या मदतीने 6 रन्सवर खेळत होता.तेव्हा राजस्थान रॉयल्स चा स्कोर 17.4ओव्हर्स मध्ये 161 रन्सवर 4 विकेट्स असा होता.



RR vs CSK: देवदत्त पदिक्कल आणि धृव जुरेल ने एकोणिसाव्या ओव्हर मध्ये महेश थिकसना च्या बॉलिंगवर 16 रन्स काढून ताबडतोब खेळी करत, 1 षटकार आणि 2 चौकार च्या मदतीने 16 रन्स काढले, त्यांनतर शेवटच्या एम पॅथीरणा च्या बॉलिंगवर दोघांनी चांगलाच समाचार घेतला, शेवटच्या ओव्हर च्या पहिल्या बॉल वर धृव जुरेल ने एक उत्तुंग षटकार लावला त्यांनतर दुसऱ्या बॉलवर 1 चौकार ठोकला आणि तिसऱ्या बॉलवर 2 रन्स काढण्याच्या नादात धृव जुरेल ने आपली विकेट गमावली, त्याला महेंद्रसिंग धोनी ने धाव बाद केले.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: राजस्थान रॉयल्स कडून शेवटच्या ओव्हर्स मध्ये धृव जुरेल च्या  15 बॉल्स मध्ये 3 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 34 रन्सच्या जोरावर आणि देवदत्त पदिक्कल च्या नाबाद 13 बॉल्स मध्ये 5 चौकार च्या मदतीने 27 रन्सच्या जोरावर राजस्थान रॉयल्स ने 202 रन्सचा आव्हानात्मक स्कोर उभा केला आणि चेन्नई सुपर किंग्स ला 202 रन्स चा टार्गेट दिले, राजस्थान रॉयल्स बे 20 ओव्हर्स मध्ये 5 विकेट्स गमावून 202 रन्स केले.



RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स च्या बॉलर्स ची राजस्थान रॉयलकडून चांगलीच धुलाई झाली होती, चेन्नई कडून आकाश सिंग ने एकही विकेट न घेता 2 ओव्हर्स मध्ये 32 रन्स खर्च केले, तुषार देशपांडे ने 4 ओव्हर्स मध्ये 42 रन्स खर्च करून 2 विकेट्स घेतल्या, महेश थिकसना ने 4 ओव्हर्स मंधे 24 रन्स देऊन 1 विकेट घेतली, रवींद्र जडेजा ने 4 ओव्हर्स मध्ये 32 रन्स खर्च करून 1 विकेट घेतली, तर मोईन अलीने एकही विकेट ब घेता 2 ओव्हर्स मध्ये 17 रन्स केले आणि मथिशा पॅथीरणा ने 4 ओव्हर्स मध्ये एकही विकेट न घेता तब्बल 48 रन्स खर्च केले.



RR vs CSK: राजस्थान रॉयल्स ने यशस्वी जयस्वाल च्या 77 रन्सच्या खेळीच्या जोरावर आणि धृव जुरेल, देवदत्त पदिक्कल च्या ताबडतोब खेळीच्या जोरावर 202 रन्सचा डोंगर उभा केला, त्या टार्गेट चा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स कडून सुद्धा चांगली सुरवात करण्याचा प्रयत्न झाला.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स कडून सलामीला खेळायला आलेले ऋतुराज गायकवाड आणि देवोन कॉनवे यांनी चांगली सुरवात करून देण्याचा प्रयत्न केला मात्र देवोन कॉनवे मोठा शॉर्ट खेळण्याच्या नादात आपली विकेट देऊन बसला, त्याने 16 बॉल्स मध्ये 1 चौकार च्या मदतीने 8 रन्स केले, त्याला एडम झम्पा ने संदीप शर्मा कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 6 ओव्हर्स मध्ये 42 रन्सवर 1 विकेट असा होता.



RR vs CSK: तिकडे देवोन कॉनवे ने 16 बॉल्स खाऊन मात्र 8 रन्स केले असतांना ऋतुराज गायकवाड ने मात्र फटकेबाजी चालू ठेवली होती, तो 26 बॉल्स मध्ये 4 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 42 रन्सवर खेळत होता, त्याला साथ द्यायला अजिंक्य रहाणे मैदानात उतरला होता, तेव्हा अजिंक्य रहाणे 5 रन्सवर खेळत होता, चेन्नई सुपर किंग्ज चा स्कोर 8 ओव्हर्स मध्ये 59 रन्सवर 1 आउट असा होता.



RR vs CSK: ऋतुराज गायकवाड ची ताबडतोब खेळी बघता, तो अर्धशतक करेल असं वाटत असताना त्याला तो 47 रन्सवर एडम झम्पा ने देवदत्त पदिक्कल कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 9.2 ओव्हर्स मध्ये 69 वर 2 आऊट असा होता.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स चे 69 रन्स वर 2 विकेट्स असतांना अजिंक्य रहाणे  आणि शिवम दुबे खेळत असताना, चेन्नई सुपर किंग्स ची तिसरी विकेट पडली ती अजिंक्य रहाणे च्या रुपात,तो 13 बॉल्स मध्ये 15 रन्स करून आउट झाला, त्याला  रवीचंद्रन आश्विन ने जोस बटलर कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 10.2 ओव्हर्स मध्ये 73 रन्स वर 3 विकेट्स असा होता.



RR vs CSK: अजिंक्य रहाणे आउट झाल्यावर मैदानावर खेळायला आलेल्या अंबाती रायडू ने त्याची फ्लॉप ची मालिका कायम ठेवत आजपण त्याने चेन्नई सुपर किंग्स च्या प्रेक्षकांना निराश केले, तो भोपळा ना फोडता तंबूत परतला, त्याला रवीचंद्रन अश्विन ने जेसन होल्डर कडे कॅच देउन आउट केले.



RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स चे 73 रन्सवर 4 विकेट्स गेलेले असताना 56 बॉल्स मध्ये जिंकायला 131 रन्सची गरज असताना, खेळायला आलेले शिवम दुबे आणि मोईन अली यांच्यावर दबाव होता, तेव्हा शिवम दुबे 10 बॉल्स मध्ये 8 रन्सवर खेळत होता तर  मोईन आलीं 1 चौकार आणि 2 षटकार च्या  मदतीने 18 रन्सवर खेळत होता. तेव्हा चेन्नई सुपर किंग्स ला जिंकायला 42 बॉल्स मध्ये 105 रन्सची गरज होती.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: राजस्थान रॉयलकडून रवीचंद्रन अश्विन ने टाकलेल्या 14 व्या ओव्हर्स च्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर शिवम दुबे ने एकापाठोपाठ 2 गगनचुंबी षटकार ठोकत रन्स वाढवायला मदत केली, त्यानंतर त्याने 1 रन काढून मोईन अली ला स्ट्राईक दिली,तेव्हा चेन्नई सुपर किंग्स चा स्कोर 13.5 ओव्हर्स मध्ये 112 रन्सवर 4 विकेट्स असा होता.



RR vs CSK: चेन्नईला जिंकायला 33 बॉलमध्ये 83 रन्सची गरज असताना चेन्नईकडून शिवम दुबे आणि मोईन अली मैदानावर खेळत असताना अचानक मोईन अली ने आपली विकेट गमावली, त्याने 12 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 23 रन्स केले, त्याला  एडम झम्पाने संजू सॅमसन कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा चेन्नई सुपर किंगसला जिंकायला 30 बॉल्समध्ये 68 रन्सची गरज होती.



RR vs CSK: चेन्नई सुपर किंग चे 127 रन्सवर 5 विकेट्स पडलेले असताना  मैदानावर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा खेळत होते, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्टपणे दिसत होता, दुसऱ्या ड्रिंक्स पर्यंत शिवम दुबे 20 बॉल्स मध्ये 31 रन्सवर खेळत होता तर रविंद्र जडेजा 4 बॉल्समध्ये 3 रन्सवर खेळत होता.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्स ला लक्ष पार करणं अवघड वाटत असताना मात्र इकडे शिवम दुबे ने अर्धशतकीय खेळी केली,त्याने 29 बॉल्स मध्ये 2 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार च्या मदतीने 50 रन्स पूर्ण करून आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स ला जिंकायला 6 बॉल्स मध्ये 37 रुन्स ची गरज होती.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: शिवम दुबे ची अर्धशतकीय खेळी झालेली असताना इकडे रवींद्र जडेजा खेळत असताना, रविंद्र जडेजा 13 बॉल्स मध्ये 3 चौकार च्या मदतीने 21 रन्सवर खेळत होता,, तेव्हा चेन्नई ला जिंकायला 4 बॉल्स मध्ये 37 रन्सची गरज होती आणि लक्ष गाठणं चषक6 झालेलं होतं.रविंद्र जडेजा 15 बॉल्स मध्ये 23 रन्स करून नाबाद राहिला तर शिवम दुबेची शेवटच्या बॉलवर विकेट पडली त्याने 33 बॉल्समध्ये 52 रन्स केले, त्याला कुलदीप यादव ने जोस बटलर कडे कॅच देऊन आउट केले आणि राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स चा 32 रन्सनी धुव्वा उडवला.



RR vs CSK
RR vs CSK

RR vs CSK: राजस्थान रॉयल्स कडून एडम झम्पाने 3 ओव्हर्स मध्ये 22 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या,तर रवीचंद्रन आश्विन ने 4 ओव्हर्स मध्ये 35 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादव ने 3 ओव्हर्स मध्ये 18 रन्स देऊन 1 विकेट घेतली,जेसन होल्डर ने सर्वाधिक एकही विकेट न घेता 49 रन्स खर्च केले, संदीप शर्मा ने 4 ओव्हर्स मध्ये 24 रन्स दिले, यझुरवेंद्र चाहल ने 2 ओव्हर्स मध्ये 21 रन्स दिले.






































































No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.