LSG vs PBKS Highlights IPL 2023 IPL 2023 Points Table लखनऊ सुपर जायन्ट्स चा पंजाब किंग्स वर 56 रन्सनी दणदणीत विजय

 LSG vs PBKS  Highlights IPL 2023 IPL 2023 Points Table लखनऊ सुपर जायन्ट्स चा पंजाब किंग्स वर 56 रन्सनी दणदणीत विजय.

LGS vs PBKS
LGS vs PBKS

LSG vs PBKS
LSG vs PBKS

लखनऊ सुपर जायन्ट्स ने केली धामाकेदार सुरवात

LSG vs PBKS: प्रथम फलंदाजीला उतरलेला लखनऊ सुपर जायन्ट्स संघाची सुरवात पाहिजे तशी झाली नाही, लखनऊ सुपर जायन्ट्स कडून सलामीला खेळायला आलेले, कर्णधार के एल राहुल आणि कायले मेयर्स यांनी मिळून फटकेबाजी केली खरी, पण ती जास्त टिकू शकली नाही.लखनऊ सुपर जायन्ट्स ची पहिली विकेट 41 रन्स वर पडली.

के एल राहुल लवकर बाद झाला

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स कडून कर्णधार लवकर बाद झाला,चौथ्या ओव्हर्स च्या दुसऱ्या बॉलवर तो अवघ्या 12 रन्स करून आउट झाला, त्याने 9 बॉल्स मध्ये 1 चौकार आणि एक षटकार च्या मदतीने 12 रन्स केले, त्याला कसिगो रबाडा ने शाहरूख खान कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 41 रन्स वर 1 विकेट असा होता.

कायले मेयर्स ने केले शानदार अर्धशतक

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 41 वर 1 विकेट असा असतांना तिकडे कायले मेयर्स ने फटकेबाजी सुरु ठेवली होती, के एल राहुल आउट झाल्यावर, त्याच्याजागी खेळायला आलेला, आयुष् बोदोनी सोबत त्याने फटकेबाजी केली आणि शानदार अर्धशतक केले, कायले मेयर्स ने 24 बॉल्स मध्ये 7 चौकार आणि 4 षटकार च्या मदतीने 54 रन्स केले, त्याला कसिगो रबाडा ने शिखर धवन कडे कॅच देऊन आउट केले.तो आउट झाला तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 5.5 ओव्हर्स मध्ये 74 रन्सवर 2 विकेट्स असा होता.


आयुष बदोनीने केली चौफेर फटकेबाजी

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स च्या 74 वर 2 विकेट्स पडलेले असतांना आयुष् बदोनीने चौफेर फटकेबाजी करत 24 बॉल्स मध्ये 3 चौकार आणि 3 षटकार च्या मदतीने शानदार 43 रन्स  केलेत, त्याला लायम लिविंगस्टोन ने राहुल चहर कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 13.3 ओव्हर्स मध्ये 163 वर 3 विकेट्स असा होता.


मार्कस स्टोईनीस ने केले धामाकेदार अर्धशतक

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स च्या 163 वर 3 विकेट्स असताना मार्कस स्टोईनीस ने नेहमीप्रमाणे आपली खेळी सुरू ठेवत  कालच्या मॅच मध्ये धामाकेदार अर्धशतकीय पारी खेळली, 16. 4 ओव्हर्स मध्ये तो 36 बॉल्स मध्ये 5 चौकार आणि 4 षटकार च्या मदतीने 61 रन्सवर खेळत होता, त्याच्या सोबतीला निकोलस पुरण 13 बॉल्स मध्ये 6 चौकार च्या मदतीने 32 रन्सवर खेळत होता.


निकोलस पुरण ने बॉलर्स ची पिसं काढली

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:अर्शदीप सिंग च्या सतराव्या ओव्हर् मध्ये निकोलस पुरण अर्षदीप च्या ओव्हर चा सामना करत असताना ,पुरण ने अर्षदीप ची अक्षरशः पिसे काढली त्याने 3 चौकार च्या मदतीने एक ओव्हर साधे 15 रन्स काढली आणि  कसिगो रबाडाला 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत 19 रन्स काढले, तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर वाढवायला मदत केली, तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर 17 ओव्हर मध्ये 235 रन्सवर 3 विकेट्स असा होता.


मार्कस स्टोईनीस चं वादळ 72 रन्सवर थांबलं

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स ला सोळाव्या ओव्हर मध्ये 200 रन्स चा टप्पा गाठून देणारा मार्कस स्टोईनीस 19 व्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉलवर 40 बॉल्समध्ये 6 चौकार आणि 5 षटकार च्या मदतीने 72 रन्स केले, त्याला सॅम करण ने जितेश शर्मा कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा लखनऊ सुपर जायन्ट्स चा स्कोर  18.2 ओव्हर मध्ये 239 रन्सवर 4 विकेट्स असा होता.


निकोलस पुरण ची वादळी खेळी सुरूच होती

LSG vs PBKS:मार्कस स्टोईनीस आउट झाल्यावर त्याच्या जागेवर खेळायला आलेला दीपक हुड्डासोबत निकोलस पूर्ण ची खेळी सुरूच होती,तिकडे दीपक हुड्डा ने शेवटच्या ओव्हर मध्ये अर्षदीप सिंग च्या बॉलिंगवर एक चौकार मारत आपले 11 रन्स केले होते, पण तिकडे निकोलस पुरण ला खेळता आले नाही त्याने दीपक हुड्डा ला 1 रन ची स्ट्राईक दिली.


निकोलस पुरण शेवटच्या ओव्हर मधे आउट झाला

LSG vs PBKS:शेवटच्या ओव्हर च्या चौथ्या बॉलवर निकोलस पुरण LBW आउट झाला, त्याला अर्षदीप सिंग ने आउट केले, त्याने 19 बॉल्स मध्ये 7 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 46 रन्स केले,त्याचे अर्धशतक 4 रन्सनी हुकले.


लखनऊ सुपर जायन्ट्स ने केली पंजाब च्या बॉलर्स ची धुलाई

LSG vs PBKS:कायले मेयर्स, आयुष बदोनी, मार्कस स्टोईनीस आणि निकोलस पुरण यांच्या धामाकेदार खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायन्ट्स ने पंजाब किंग्ज ला 258 रन्सचं बलाढ्य लक्ष दिले,पंजाब किंग्स कडून गुरनुर ब्रार ने 3 ओव्हर्स मध्ये 42 रन्स खर्च केले, अर्शदीप सिंग ने 4 ओव्हर्स मध्ये तब्बल 54 रन्स करून 1 विकेट् घेतली, कसिगो रबडा ने 4 ओव्हर्स मध्ये 52 रन्स खर्च करून 2 विकेट्स घेतल्या, सिकंदर रजा ने 1 ओव्हर मध्ये 17 रन्स दिले, राहुल चहर ने 4 ओव्हर्स मध्ये 29 रन्स दिले,सॅम करण ने 3 ओव्हर्स मध्ये 38 रन्स देऊन 1 विकेट घेतली तर लायम लिविंगस्टोन ने 1 ओव्हर मध्ये 19 रन्स देऊन 1 विकेट् घेतली.


लखनऊ सुपर जायन्ट्स ने दिले पंजाब किंग्स ला 258 रन्सचं लक्ष

LSG vs PBKS:लखनऊ सुपर जायन्ट्स ने पंजाब किंग्स ला 258 रन्सचा पाठलाग करत असताना पंजाब किंगसची सुरुवात खुपच खराब झाली, पंजाब किंगसची पहिली विकेट फक्त 3 रन्सवर पडली आणि पंजाब किंग्स ला पहिला धक्का बसला.


शिखर धवन च्या रुपात पडली पंजाबची पहिली विकेट

LSG vs PBKS:पंजाब किंग्स कडून सालामीला आलेले प्रभसीमरण सिंग आणि कर्णधार शिखर धवन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना, त्यांनी आज पंजाब किंग्स च्या प्रेक्षकांना निराश केले, पंजाब किंगसचा कर्णधार शिखर धवन स्वस्तात आउट झाला, त्याने 2 बॉल्स मध्ये 1 रन्स केला, त्याला मार्कस स्टोईनीस ने कृनाल पंड्या कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा पंजाब किंगसचा स्कोर 5 बॉल्स मध्ये 3 रन्स असा झाला होता.

प्रभसीमरण सिग पण स्वस्तात गेला

LSG vs PBKS:शिखर धवन सोबत सलामीला खेळायला आलेला प्रभसीमरण सिंग स्वस्तात आउट झाला, त्याने 13 बॉल्स मध्ये  2 चौकार च्या मदतीने 9 रन्स केले, त्याला नवीन उल हक ने डॅनियल सॅम कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा पंजाब चा स्कोर 3.4 ओव्हर्स मध्ये 31 रन्स वर 2 विकेट्स असा होता.


अथर्व तायडे ने केली शानदार खेळी

LSG vs PBKS:31 रन्सवर पंजाब च्या 2 विकेट्स गेल्या असतांना खेळायला आलेला अथर्व तायडे ने शानदार खेळी करत 18 बॉल्समध्ये 5 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 42 रन्सवर खेळत होता त्याच्या सोबतीला सिकंदर रजा 9 बॉल्समध्ये 1 चौकार च्या मदतीने 13 रन्सवर खेळत होता, तेव्हा पंजाब किंग्स ला 74 बॉल्समध्ये 183 रन्सची जिंकण्यासाठी गरज होती.


अथर्व तायडे ने केले अर्धशतक

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:पंजाब किंग्स चे 89 रन्सवर 2 विकेट्स असतांना, अथर्व तायडे ने चतुर खेळी करत, आपले अर्धशतक पूर्ण केले,त्याने 28 बॉल्स मध्ये 6 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले, टिकडे सिकंदर रजा पण त्याला अपेक्षित साथ देत होता, तेव्हा सिकंदर रजा 19 बॉल्समध्ये 3 चौकार च्या मदतीने 26 रन्सवर खेळत होता.तेव्हा पंजाब किंग्स ला 56 बॉल्समध्ये 162 रन्सची जिंकण्यासाठी गरज होती.


सिकंदर रजा ने केली तांबडतोब खेळी

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:पंजाब किंगसचे 11.2 ओव्हर्स मध्ये 109 रन्सवर 2 विकेट्स असतांना,पंजाबची तिसरी विकेट्स पडली, सिकंदर रजा 22 बॉल्समध्ये 4 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 36 रन्स करून आउट झाला, त्याला यश ठाकूर ने कृनाल पंड्या कडे कॅच देऊन आउट केले.


अथर्व तायडे आणि लायम लिविंगस्टोन खेळत होते

LSG vs PBKS:109 रन्सवर पंजाब किंगसची तिसरी विकेट पडलेली असतांना आणि जिंकायला 42 बॉल्स मध्ये 131 रन्सची गरज असताना, मैदानावर खेळत असलेले अथर्व तायडे आणि लायम लिविंगस्टोन यांनी खेळी पुढे नेत असतांना पंजाब किंगसची चौथी विकेट् पडली.


अथर्व तायडे ने केले शानदार 66 रन्स

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:पंजाब किंग्सच्या 127 रन्सवर 3 विकेट्स असताना ,पंजाब ची चौथी विकेट पडली, अथर्व तायडे ने 36 बॉल्समध्ये 8 चौकार आणि 2 षटकार च्या मदतीने 66 रन्स केले, त्याला रवी बिश्नोई ने कॉट अँड बोल्ड आउट केले, तेव्हा पंजाब किंग्स ला 42 बॉल्समध्ये 130 रन्सची गरज होती.


लायम लिविंगस्टोन आणि सॅम करण खेळत होते

LSG vs PBKS:पंजाब किंग्स चा 14.4 ओव्हर्स मध्ये 151 रन्सवर 4 विकेट्स असतांना लिविंगस्टोन 10 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 22 रन्सवर खेळत होता तर सॅम करण 5 बॉल्स मध्ये 1 षटकार च्या मदतीने 10 रन्सवर खेळत होता.


दुसऱ्या ड्रिंकस पर्यत पंजाब किंग्स ला 30 बॉल्समध्ये जिंकायला 106 रन्सची गरज होती

LSG vs PBKS:ड्रिंक्स नंतर सोळाव्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉलवर लिविंगस्टोन ने आपली विकेट फेकली, तो 14 बॉल्स मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 23 रन्सवर आउट झाला, त्याला रवी बिश्नोई ने LBW आउट केले.तेव्हा पंजाब किंग्स ला जिंकायला  24 बॉल्समध्ये 97 रन्सची गरज होती.


सॅम करणं आणि जितेश शर्मा खेळपट्टी वर होते

LSG vs PBKS:सॅम करण आणि जितेश शर्मा मैदानावर खेळत असताना सॅम करण 7 बॉलमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 15 रन्सवर खेळत होता, तर जितेश शर्मा 5 बॉल्समध्ये 1 षटकार च्या मदतीने 11 रन्सवर खेळत होता. तेव्हा पंजाब किंग्स चे 173 रन्सवर 5 विकेट्स होते.


पंजाब किंग्सची सलग तीन विकेट्स पडल्या

LSG vs PBKS:173 रन्सवर पंजाब किंग्सचे 5 विकेट्स असतांना पंजाब ची सहावी विकेट्स सॅम करण ची पडली, तो 11 बॉल्समध्ये 2 चौकार आणि 1 षटकार च्या मदतीने 21 रन्स करू शकला त्याला नवीन उल हक ने आयुष बदोनी कडे कॅच देऊन आउट केले, त्यांनतर 192 रन्सवर जितेश शर्मा 10 बॉल्समध्ये 3 षटकार च्या मदतीने 24 रन्स केले, त्याला यश ठाकूर ने के एल राहुल कडे कॅच देऊन आउट केले.त्यापाठोपाठ पंजाबची आठवी विकेट 193 रन्सवर पडली, राहुल चहर शून्यावर आऊट झाला, त्याला यश ठाकूर ने दीपक हुड्डा कडे कॅच देऊन आउट केले.त्यानंतर कसिगो रबाडा सुद्धा शून्यावर आउट झाला, त्याला नवीन उल हक ने बोल्ड केले.


शेवटच्या ओव्हर मध्ये 59 रन्सची गरज होती

LSG vs PBKS:शेवटच्या ओव्हर मध्ये शाहरुख खान आणि अर्षदीप सिंग खेळत असताना शाहरुख 9 बॉल्समध्ये 6 रन्स करून आउट झाला, त्याला यश ठाकूर ने रवि बिश्नोई कडे कॅच देऊन आउट केले, आणि अर्षदीप सिंग 2 बॉल्स मध्ये 2 रन्स करून नाबाद राहिला.त्यामुळे लखनऊ सुपर जायन्ट्स ने पंजाब की किंग्स वर 56 रन्सनी दणदणीत विजय मिळवला.


लखनऊ कडून यश ठाकूर ने घेतल्या सर्वाधिक 4 विकेट्स

LSG vs PBKS
LSG vs PBKS

LSG vs PBKS:लखनऊ कडून यश ठाकूर ने 3.5 ओव्हर्स मध्ये 37 रन्स देऊनवघेतल्या सर्वाधिक 4 विकेट्स ,त्यापाठोपाठ नवीन उल हाक ने 4 ओव्हर्स मध्ये 30 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या,त्यानंतर रवी बिश्नोई ने 4 ओव्हर्स मध्ये 41 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या,त्यानंतर कायले मेयर्स ने 1 ओव्हर मध्ये 4 रन्स दिले, त्यानंतर आवेश खान ने 2 ओव्हर्स मध्ये 28 रन्स दिले,अमित मिश्रा ने 2 ओव्हर्स मध्ये 23 रन्स दिले आणि कृनाल पंड्याने 1 ओव्हर मध्ये 13 रन्स दिले,.


LSG vs PBKS

IPL POINTS TABLE
IPL POINTS TABLE


IPL POINTS TABLE
IPL POINTS TABLE




                                                              शेठ हे पण वाचा:-





































































No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.