LSG VS GT Highlights Dream 11 Prediction IPL 2023 Points Table, Gujarat Titans ने Lucknow Super Giants चा 7 रन्स ने केला पराभव
LSG VS GT Highlights Dream 11 Prediction IPL 2023 Points Table, Gujarat Titans ने Lucknow Super Giants चा 7 रन्स ने केला पराभव
LSG VS GT Match 30

LSG VS GT Match 30, आज Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow येथे झालेल्या , Lucknow Super Giatns विरुद्ध Gujarat Titans यांच्यात दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरू झालेल्या मॅच मध्ये Gujarat Titans ने Toss जिंकून प्रथम batting करण्याच्या निर्णय घेतला.
प्रथम batting करण्याचा घेतलेला निर्णय Gujarat Titans ला महागात पडेल असं वाटत असताना
प्रथम batting करायला उतरलेल्या Gujarat Titans च्या टीमला toss जिंकून प्रथम batting करण्याचा निर्णय हार्दिक पंड्याला चांगलाच महागात पडेल असं वाटत असताना Gujarat Titans ने Lucknow Super Giants वर 7 रन्सनी मात केली ,वृद्धीमान सहा आणि हार्दीक पंड्या ने चांगली फलंदाजी केली खरी पण ,लखनऊ च्या खेळपट्टीवर Gujarat Titans चे प्लेयर्स ना मानवली नाही,त्यामुळे ते 2 खेळाडू वगळता बाकीचे सपशेल फेल गेलेत,बाकीच्यांना 2 आकडी फिगर पण गाठता आली नाही,त्यामुळे Gujrat Titans 135 रन्स पर्यंतच मजल मारू शकली.
Gujarat Titans कडून सुरवात अत्यंत वाईट झाली.
Gujarat Titans कडून सालामीला आलेले वृद्धीमान सहा आणि शुभमन गिल यांच्यापैकी शुभमन किल भोपळा न फोडता शून्य रन्सवर आउट झाला, शुभमन गिल दुसऱ्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉल वर आउट झाला, त्याला कृनाल पंड्या ने रवी बिष्णोई कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा Gujarat Titans चा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 4 रन्सवर 1 विकेट असा होता.
![]() |
| LSG VS GT Match 30 |
वृद्धीमान सहा ने 47 रन्सची संयमी खेळी केली.
Gujarat Titans चा स्कोर 4 वर 1 आउट असा असतांना, शुभमन गिल च्या जागी आलेल्या कॅप्टन हार्दिक पांड्यसोबत 60 रन्सच्या वरती भागीदारी केली असतांना Gujarat Titans चा स्कोर 10.3 ओव्हर्स मध्ये 72 रन्स वर 1 विकेट असतांना वृद्धीमान सहाने आपली विकेट गमावली, त्याने 37 बॉल्स मध्ये 47 रन्स केले,त्याला सुद्धा कृनाल पंड्या ने दीपक हुड्डा कडे कॅच देऊन आउट केले.त्यामुळे Gujarat Titans चा स्कोर 10.3 ओव्हर्स मध्ये 72 रन्स वर 2 विकेट असा झाला.
अभिनव मनोहर आणि विजय शंकर झटपट आउट झाले
वृद्धीमान सहा आऊट झाल्यावर खेळायला आलेला अभिनव मनोहर याने 5 बॉल्स मध्ये मात्र 3 रन्स केले, त्याला अमित मिश्रा ने नवीन उल हक कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर आलेला विजय शंकर ने थोडा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुद्धा मोठी खेळी करता आली नाही, तो पण 12 बॉल्स मध्ये 10 रन्स करून आउट झाला, त्यामुळे Gujarat Titans चा स्कोर 15 ओव्हर्स मध्ये 92 रन्स वर 4 विकेट्स असा होता.
15 ओव्हर्स मध्ये 4 विकेट्स पडल्यावर डेव्हिड मिलर सोबत खेळत असतांना Gujarat Titans चा कर्णधार हार्दिक पंड्या ने शानदार 50 बॉल्स मध्ये 66 रन्स केले, त्याला मार्कस स्टोईनीस ने Lucknow Super Giants चा कर्णधार के एल राहुल कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा Gujarat Titans चा स्कोर 19.2 ओव्हर्स मध्ये 132 रन्सवर 5 विकेट असा झाला होता.
शेवटच्या ओव्हर मध्ये Gujarat Titans चा कर्णधार हार्दिक पंड्या आउट झाल्यावर आलेला राहुल तेवतीया नॉट आउट राहिला त्याने 2 बॉल्स मध्ये 2 रन्स केले,तर डेव्हिड मिलर शेवटच्या ओव्हर च्या शेवटच्या बॉल वर आउट झाला, त्याला मार्कस स्टोईनीस ने दिपक हुड्डा कडे कॅच देऊन आउट केले,त्याने 12 बॉल्स मध्ये 6 रन्स केले, तेव्हा Gujarat Titans चा स्कोर 20 ओव्हर्स मध्ये 6 विकेट गमावून 135 रन्सवर आटोपला, तेव्हा Lucknow Super Giants कडून कृनाल पंड्या आणि मार्कस स्टोईनीस ने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर नवीन उल हक आणि अमित मिश्रा ने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Gujarat Titans ने Lucknow Super Giants ला दिले 136 रन्सचं लक्ष

LSG VS GT Match 30

Gujarat Titans ने दिलेल्या 135 रन्स चा पाठलाग करताना Lucknow Super Giants ची सुरुवात चांगली झाली Lucknow Super Giants कडून कर्णधार के एल राहुल आणि कायले मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी 50 रन्सची भागीदारी केली, कायले मेयर्स ने 2 चौकारांच्या मदतीने 19 बॉल्स मध्ये 24 रन्स केले.त्याला रशीद खान ने क्लीन बोल्ड केले,तेव्हा Lucknow Super Giants चा स्कोर 6.3 ओव्हर्स मध्ये 55 रन्सवर 1 विकेट असा होता.
कृनाल पंड्या आणि के एल राहुल ने केला 100 चा टप्पा पार
कृनाल पंड्या आणि के ले4 राहुल यांनी सुद्धा 50 रन्सची भागीदारि करून आपल्या Lucknow Super Giants ला 100 रन्स चा टप्पा पार करून दिला Lucknow Super Giants चा स्कोर 14.3 ओव्हर्स मध्ये 106 रन्स असतांना कृनाल पंड्या 23 बॉल्स मध्ये 2 चौकार आणि एका षटकार च्या मदतीने 23 रन्स केले, त्याला नूर अहमद ने वृद्धीमान सहा करवी स्टम्पिंग करून आउट केले.
Lucknow Super Giants ला जिंकायला 33 बॉल्स मध्ये 30 रन्स हवे होते.
106 रन्स वर 2 विकेट पडलेले असताना Lucknow Super Giants ला जिंकायला 8 विकेट शिल्लक असतांना 33 बॉल्स मध्ये 30 रुन्स पाहिजे असतांना, Lucknow Super Giants चा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला खेळायला आलेला निकोलस पुरण 7 बॉल्स खाऊन फक्त 1 रन् काढू शकला,त्याला नूर अहमद ने हार्दिक पंड्या कडे कॅच देऊन आउट केले, त्यानंतर के एल राहुल आउट झाला,त्यांनतर आलेला आयुष बदोनी 6 बॉल्स मध्ये 8 रन्स करून रनआउट झाला, त्याला विजय शंकर ने रनआउट केले,मार्कस स्टोईनीस शून्यावर आउट झाला, त्याला मोहीत शर्मा ने डेव्हिड मिलर कडे कॅच देऊन आउट केले, दीपक हुड्डा ने 2 बॉल्स मध्ये 2 रन्स केले, त्याला रशीद खान ने रनआउट केले,शेवटी रवी बिष्णोई शून्यावर नॉट आउट राहिला.के एल राहुल ने केले 68 रन्स
![]() |
| LSG VS GT Match 30 |
एकीकडे Lucknow Super Giants चे खेळाडू एकामागून एक आउट होत असताना Lucknow Super Giants चा कर्णधार के एल राहुल याने 61 बॉल्स मध्ये 8 चौकार च्या मदतीने 68 रन्स केले, त्याला मोहित शर्मा ने जयंत यादव कडे कॅच देऊन आउट केले.
135 रन्सचा पाठलाग करत असताना असे वाटले होते की Lucknow Super Giants आरामात मॅच आपल्या खिशात घालेल पण, संध्याकाळ होईपर्यंत खेळपट्टी जास्तच बॉलर्स मदतीची ठरत होती त्यामुळे Lucknow Super Giants ला 135 रन्स चा टप्पा गाठता आला नाही. आNI Gujarat Titans कडुन Lucknow Super Giants चा 7 रन्सनी पराभव झाला,Gujarat Titans कडून मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर रशीद खान ने 1 विकेट घेतली.
LSG VS GT Match 30
💢IPL 2023 Points Table💢
IPL 2023 Points Table
शेठ हे पण वाचा:-



Post a Comment