नकल-बॉल-KNUCKLE-BALL ज्याने IPL आणि T20 क्रिकेट ला स्थिर केलं.

नकल-बॉल-KNUCKLE-BALL ज्याने IPL आणि T20 क्रिकेट ला स्थिर केलं. 
नकल-बॉल-KNUCKLE-BALL
नकल-बॉल-KNUCKLE-BALL


      नकल बॉल म्हणजे तुम्ही समजत आहात तसा नकली बॉल वैगेरे तसं काही नाहीये,नकल बॉल म्हणजे बेसबॉल मधला एक प्रकार, आता तूम्ही म्हणाल बेसबॉल आणि क्रिकेट चा काय संबंध, तर संबंध आहे. 

            90 च्या दशकात दक्षिण अफिकेचा एक बॉलर बॉलिंग करताना स्लो बॉल वेगळ्याच पद्धतीने टाकायचा आणि ते आपल्या भारतीय टीम मधला, आपल्या महाराष्ट्राच्या श्रीरामपूर चा रहिवासी असलेला खेळाडू म्हणजे zak म्हणजेच झहीर खान. 

सौरव गांगुली च्या नेतृत्वाखाली मिळाली भारतीय संघात संधी-नकल-बॉल-KNUCKLE-BALL

        सौरव गांगुली च्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या झहीर खानचा यॉर्कर स्विंग समोरील फलंदाजांची कधी दांडी गुल करायचा त्याचा फलंदाजाला थांगपत्ताच लागायचा नाही, बॉलर फलंदाजांच्या पायाखालून डायरेक्ट त्रिफळाच उडवायचा.

 2003 च्या वर्ल्ड कप मधे झहीर ला मिळाली संधी-नकल-बॉल-KNUCKLE-BALL 

                हे बघून गांगुली ने झहीर खान ला 2003 च्या वर्ड कप मधे संधी दिली आणि झहीर च्या कारकीर्द ला खऱ्या अर्थाने सुरवात झाली, पण 2007 ते 2010 च्या काळात दुखापतीमुळे झहीर चा फॉर्म हरवला आणि तो संघाच्या बाहेर पडला, मग अचानक झहीर ने 2010 मध्ये आपलं अस्त्र बाहेर काढलं ते म्हणजे नकल बॉल आणि जोरदार पुनरागमन केलं. 

2011 च्या वर्ल्ड कप मध्ये प्रथम आजमवला-नकल-बॉल-KNUCKLE-BALL

       झहीर खान ने नकल बॉल चा प्रयोग प्रथम 2011 च्या भारतात झालेल्या वर्ल्ड कप मध्ये केला आणि त्याचं फळही त्याला मिळालं झहीर ने वर्ल्ड कप मध्ये तब्बल सर्वाधिक 21 विकेट घेतल्या. 
   
नकल-बॉल-KNUCKLE-BALL
नकल-बॉल-KNUCKLE-BALL


IPL मध्ये सुरू केला नकल-बॉल-KNUCKLE-BALL चा प्रयोग

        मग त्याचा प्रयोग झहीर ने IPL मध्ये चालू केला IPL-T20 क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजाचा खेळ आणि बॉलर्स फक्त धुलाई समजल्या जाणाऱ्या IPL,T20 क्रिकेट मध्ये नकल बॉल नावाचं अस्त्र वापरून फलंदाजांच्या फलंदाजी वर नियंत्रण मिळवलं मग हा प्रयोग भुवनेश्वर कुमार पासून तर आता आलेल्या हर्षल पटेल ने जवळपास सर्वच बॉलर्स ने केला आणि त्याचे परिणामही आपल्याला दिसले. 

आणि बॉलर्स च्या बॉलिंग ला धार आली-नकल-बॉल-KNUCKLE-BALL 

 तेव्हापासून आतापर्यंत सगळेच बॉलर्स, बॅट्समन च्या नाकी नऊ आणू लागले जिथे फक्त फलंदाजांची चालायची तिथे आता बॉलर्स ची पण चालू लागली आणि अटीतटीच्या सामना बघायला इंटरेस्ट येऊन सामन्यात रंगत वाढू लागली.

मग तुम्हाला कसा वाटला हा किस्सा तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, धन्यवाद.

शेठ हे पण वाचा:-

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.