Paul ValthatyIPL मध्ये शतक ठोकून रातोरात उजेडात येणार हा तारा नक्की कुठे गायब झाला

 

Paul Valthaty IPL मध्ये शतक ठोकून रातोरात उजेडात येणार हा तारा नक्की कुठे गायब झाला.

Paul Valthaty IPL
Paul Valthaty IPL


   क्रिकेट म्हटलं म्हणजे येतं, हार-जीत, चढ-उतार, ग्लॅमरस, लाईमलाईट,हे सगळं आलंच, क्रिकेट हा असा खेळ आहे की एखाद्याला एका रात्रीत स्टार बनवून टाकत तर एखाद्याला एका रात्रीत जमिनीवर आणू शकतं, क्रिकेट म्हणजे भारतात लोकांसाठी सनासारखा साजरा होतो,ती एक लोकांसाठी पर्वणीच असते, मग एखादा खेळाडू अचानक चमकला की लोकांच्या त्याच्याकडून जास्तीच्या वाढून जातात,पण इथपर्यंत पोहचण्यासाठी खेळाडूला अथक परिश्रम आणि चिकाटी ही  खूप महत्त्वाची असते त्यामुळे, इथपर्यंत येणं आणि मुख्य म्हणजे टिकून राहणं तितकंच महत्वाचं असतं. तर आपण आज गोष्ट करणार आहे असा एक खेळाडू जो रातोरात स्टार झाला खरी पण, तेवढ्याच लवकर रातोरात गायब सुद्धा झाला.तर आपण गोष्ट करत आहोत Paul Valthaty याची. लक्षात राहूनही न लक्षात राहणारा खरा स्टार.

                 Rinku Singh-रिंकू सिंग KKR,सफाई कामगार ते IPL चा स्टार खेळाडू
Paul Valthaty दिसायला अगदी साधा,शांत आणि सरळ-Paul Valthaty IPL


Paul Valthaty दिसायला अगदी साधा,शांत आणि सरळ मात्र मैदानात खेळतांना बॅट तापली की गोलंदाजांना सळो की पळो करून सोडायचा, तर वर्ष होत 2011 चं, नुकतंच  IPL 2011 च बिगुल वाजलेल होतं,तेव्हा एक सामना झाला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स चा, चेन्नई सुपर किंग्स ने प्रथम फलंदाजी करून 189 धावांचा टार्गेट किंग्स इलेव्हन पंजाब संघाला दिला होता.

Paul Valthaty IPL
Paul Valthaty IPL


Paul Valthaty IPL,किंग्स इलेव्हन पंजाब साठी देवासारखा धावुन आला

  किंग्स इलेव्हन पंजाब कडे ऍड गिलख्रिस्ट ,शॉन मार्श, डेव्हिड मिलर सारखे महान फिल्डर असूनही,त्यापैकी एकालाही त्या सामन्यात फारसी कमाल दाखवता आली नाही, मात्र नंबर आला तो पॉल वलथाटी चा, मग काय भावाची गाड़ी बाटिंग ला येताबरोबर अशी काय सुसाट सुटली की ती थेट त्याचे 120 रन्स करूनच थांबली, भावाने 63 चेंडूत 120 धावा नुसत्या काढल्याच नाही तर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आणि किंग्स इलेव्हन पंजाब ला सामना जिंकून दिला.आणि हेच सातत्य पुढच्या दोन सामन्यात पण बघायला मिळालं,त्याने एका सामन्यात 47 चेंडूत 75 धावा केल्या आणि एवढं कमी की काय 4 गडी सुद्धा बाद केले.दुसऱ्या सामन्यात 46 धावा केल्या यानंतर मात्र त्याला साजेशी खेळी करता आली नाही.

Paul Valthaty IPL
Paul Valthaty IPL


एका रात्री तो स्टार झाला -Paul Valthaty IPL

त्या 120 धावांच्या खेळीनंतर त्याला भारतीय मिडिया, प्रेक्षक डोक्यावर यांनी अक्षरशः घेतलं आणि त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव व्हायला लागला, त्याला जाहिराती मिळायला लागल्या तो अचानक प्रसिद्धीस आला आणि 2 दिवस आधी कोणी ओळखत नसलेला पोळ वलथाटी अचानक स्टार झाला, हे सगळं श्रेय तो त्याने घेतलेल्या अथक परिश्रमाला देतो.

  S-Sreesanth-एस-श्रीसंथ ...नावात जरी संथ असला तरी बॉलिंग चा वेग मात्र सुसाट होता

2002 मधला अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये झाली होती डोळ्याला दुखापत-Paul Valthaty IPL

सामना होता बांग्लादेश विरुद्धच्या त्या मॅच मध्ये पार्थिव पटेल,इरफान पठाण सारखे खेळाडू त्याच्यासोबत होते, पॉल वलथाटी फलंदाजी करत असतांना, त्याला एक बाऊन्सर आला आणि हेल्मेट च्या आत घुसून डोळ्याला बसला, त्यामुळे  त्याला दिसायला अवघड झालं होतं ,त्याची दृष्टी कमी झासली होती, त्याच्या तब्बल चार लेजर शस्त्रक्रिया झाल्या.


Paul Valthaty IPL-क्रिकेट ची असलेली आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती

पुढे जाऊन त्याने परत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं आणि IPL 2011 मध्ये जोरदार प्रदर्शन करून दाखवून दिलं की शेर अभी जिंदा है.


पुढे जाऊन मनगटाला दुखापत झाली आणि त्याला ब्रेक लागला-Paul Valthaty IPL

पुढे जाऊन क्रिकेट खेळताना त्याला मनगटाला दुखापत झाली पण ती दुखापत एवढी मोठी होती की त्याला बॅट धरणं पण अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे त्याला तिथे क्रिकेट ला ब्रेक द्यावा लागला, ज्याच्याकडून भारतीयांना भारतीय क्रिकेट संघात खेळण्याच्या अपेक्षा होत्या त्या मात्र त्याच्या पूर्ण होऊ शकल्या नाही.


क्रिकेटप्रति असणारी ओढ-Paul Valthaty IPL

तो आता मुंबईत असलेल्या प्रतिशयात क्रिकेट क्लब ऑफ इंडिया या संस्थेत असलेल्या मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम तो करतो, त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, त्यांना संधी कश्या उपलब्ध होतील याकडे पुरेपुर लक्ष देतो, त्यांना घडवतो.


तर तुम्हाला आमचा आजचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

Paul Valthaty IPL







No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.